Home पिंपरी चिंचवड शाश्वतच्या मुकुटात यशाचा आणखी एक मेरुमणी

शाश्वतच्या मुकुटात यशाचा आणखी एक मेरुमणी

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी 

पुण्याचा सुपुत्र मास्टर – शाश्वत शिंदे यांनी सायकलिंगमध्ये आणखी एक अभूतपूर्व कामगिरी बजावली आहे. केवळ 17 वर्षांचा असलेल्या शाश्वत यांनी जगातील पहिल्यावहिल्या प्रकारचा विक्रम प्रस्थापित करून ‘अठरा वर्षाखालील जलद गती सायकल स्वार’ हा मानाचा किताब जिंकला आहे.

शाश्वत शिंदे याला इंग्लंडमधील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे
त्यांना 24 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील मॅरियट हॉटेल येथे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, यू.के. (इंग्लंड) तर्फे आयोजित भव्य समारंभात Eminence Excellence Award 2025 प्रदान करण्यात आला.
हा सन्मान त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी देण्यात आला — 19 जानेवारी 2025 रोजी, पुणे ते लोनावळा व परत असा 125 किमी प्रवास केवळ 3 तास 40 मिनिटांत पूर्ण करून नवीन विश्वविक्रम केला
ही शाश्वतची दुसरी जागतिक कामगिरी आहे. यापूर्वी 2019 मध्ये, फक्त 10 तास 10 मिनिटे व 10 सेकंद अखंड सायकलिंग करून त्यांनी बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे पहिला जागतिक विक्रम नोंदवला होता. त्या वेळी त्यांनी सहनशक्तीचे उत्तम उदाहरण घालून दिले होते; आणि आता सर्वात जलद विक्रम करून आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र व ट्रॉफी 🏆 सोबत देण्यात आलेला हा पुरस्कार त्यांच्या समर्पण, शिस्त व क्रीडाप्रेमाचे प्रतीक आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे ते केवळ स्वतःसाठीच नव्हे तर असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत.
वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंड तर्फे आयोजित Eminence Excellence Award Ceremony – 2025 मध्ये जगभरातील 65 मान्यवर व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला यू.के., यू.एस.ए., नेपाळ, दुबई, रशिया, ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील 15 राज्यांतील मान्यवर उपस्थित राहिले.
या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट योगदानांचा गौरव करण्यात आला. डॉ. दिवाकर सुकुल (प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, लंडन, यू.के.) हे मुख्य पाहुणे, तर प्रो. डॉ. मधु कृष्णन (चेअरमन व चीफ रेक्टर, AUGP, यू.एस.ए.) अध्यक्षस्थानी होते. तसेच मा. राजेंद्रजी दर्डा (संपादक-इन-चीफ, लोकमत ग्रुप व माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार), श्री. लोकेश चंद्र, IAS (चेअरमन व एमडी, MSEDCL – महावितरण), श्री. संजय कोहली (प्रसिद्ध निर्माता), डॉ. सूरदास प्रभू (ट्रस्टी व अध्यक्ष, ISKCON खारघर), डॉ. सोहिनी सास्त्री (ब्रँड अॅम्बेसेडर, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स) आणि श्री. अनिल जेठवानी (भारत सरकार) हे मान्यवर उपस्थित होते.
या आंतरराष्ट्रीय सोहळ्याने उत्कृष्टतेचा गौरव, नवोन्मेषाला प्रेरणा व समाजातील योगदानाचा सन्मान जागतिक पातळीवर अधोरेखित केला.
मास्टर शाश्वत शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा – अनेक टप्पे, नवे विक्रम आणि अधिक यश मिळो हीच सदिच्छा !!
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00