57
पिंपरी.
विश्वंभर चौधरी हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक प्रखर समीक्षक आणि वक्ते आहेत. त्यांनी प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांवर नेमकेपणाने हल्लाबोल केला. त्यांनी महायुतीवर टीका करताना राजकीय एकजुटीचा अभाव, अनागोंदी कारभार, तसेच जनतेच्या समस्या सोडवण्यात असलेले अपयश यावर जोरदार प्रहार केला
शेतकरी, बेरोजगारी आणि महागाईचे प्रश्न: महायुती सरकार या मुद्द्यांवर ठोस पावले उचलत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.राजकीय अस्थिरता: महायुतीमधील घटक पक्षांमध्ये असलेली अंतर्गत फूट आणि निर्णय घेण्यास होणारा विलंब यामुळे राज्याचे वाटोळे झाले आहे. विरोधकांवर दबाव आणणे, सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर कारवाई किंवा दबाव आणणे यामध्येच महायुती सरकार मश्गूल असलेले दिसत आहे.या मध्ये जर बदल घडवायचा असेल तर मतदाराने उच्च शिक्षित आणि स्वच्छ उमेदवारलाच उत्तम भविष्यासाठी मतदान केले पाहिजे असे असे सांगत डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना निवडून देण्यासाठी आवाहन केले.
ॲड असीम सरोदे यांनी देखील महायुती सरकार आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी विधान केले की, महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेतील विभाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे संविधानविरोधी आहे.
ॲड.असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, सध्याचे लोकायुक्त विधेयक हे प्रभावी नाही आणि राज्यातील भ्रष्टाचारविरोधी लढा कमजोर करेल. त्यांचे मत आहे की, हे विधेयक लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात आणू शकते.पिंपरी विधानसभेबद्दल बोलताना असीम सरोदे म्हणाले की, विरोधकांच्या मुलाखती आणि वेगवेगळे स्टेटमेंट्स पाहता पिंपरी विधान सभेमद्धे विरोधकांनी हार मान्य केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मानव कांबळे यांनी सांगितले की,पिंपरी विधानसभा निर्माण झाल्या पासून प्रथमच उच्चशिक्षित महिला उमेदवार मिळाला आहे.अशी संधी पुन्हा पुन्हा भेटणार नाही त्यामुळे मतदारांनी जागरूक राहून डॉ. सुलक्षणा यांना निवडून देणे गरजेचे आहे.
आम आदमी पक्ष शहर अध्यक्ष चेतन बेंद्रे,बौद्ध समाज विकास महा संघ शरद जाधव आदी उपस्थित होते.
Please follow and like us:
