पिंपरी
पिंपरी विधानसभा मतदार संघात पिंपरी मधील सिंधी बांधव हे पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी असल्याचे दर्शविण्यासाठी काल एका पत्रकार परिषदेचे आयोजन पिंपरी कॉलनीत करण्यात आले होते.
ही पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर मात्र माजी उपमहापौर व माजी नगरसेवक डब्बू असवानी आणि त्यांचे बंधू उद्योजक श्री असवाणी या दोघा बंधूंच्यातच हॉटेलच्या दारातच कलगीतुरा सुरू झाला.
मुळात असवानी बंधूंचे व अण्णा बनसोडे यांचे नाते काही व्यवहारात बिघडले होते. यामुळे या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांना विरोध करण्यासाठी म्हणून तसेच त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी म्हणून असवाणी बंधूंनी जंग जंग पछाडले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी असवाणी व त्यांच्याबरोबर गेलेल्या काही माजी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही भेटले होते व अण्णा बनसोडे यांच्या विरोधात त्यांनी दुसराच एक चेहरा पुढे करून त्याला उमेदवारी दिल्यास आपण सर्वजण ताकद लावून असे सांगितले होते.
असे असताना अजित पवार यांनी अगदी शेवटच्या क्षणी असवाणी बंधूंना बोलावून घेऊन समेट घडविण्याचा प्रयत्न केला. व तसेच चित्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून उभे करण्याचाही प्रयत्न केला गेला. मात्र हा समेट म्हणजे पोकळ वासा ठरला असल्याचे काल पत्रकार परिषदेनंतर दिसून आले.
या पत्रकार परिषदेत कशासाठी आलो आणि मला का बोलावले असा सवाल मागे नगरसेवक डब्बू असवाणी यांनी श्री असवाणी यांना विचारला. यावरून या दोघांच्यात हॉटेलच्या बाहेरच नाट्यमय असा कलगीतुरा घडताना पत्रकारांनी पाहिले.
या पत्रकार परिषदेत सुद्धा एका प्रश्नाला उत्तर देत असताना आम्ही अजित पवार यांना पाठिंबा देत आहोत असे उत्तर डब्बू असवाणी यांनी दिले त्यामुळे सिंधी समाज अण्णा बनसोडे यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र हे दर्शवण्याचा चाललेल्या प्रयत्नाचा बुरखा फाटला गेला.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेश बहल हे सुद्धा मनापासून उमेदवाराचे काम करत नसल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेच मत पडू लागले आहे. संत तुकाराम नगर मध्ये भाईंच्या चेल्याने मतदारांना तुम्हाला ज्याला मतदान करायचे त्याला करा असे सांगितले असल्याचे बोलले जात आहे.
