50
पिंपरी
रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पिंपरी तर्फे “रोटरी गौरव २०२५ – वित्तीय सेवा” हा पुरस्कार जेष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांना रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे नियोजित प्रांतपाल रो.नितीन ढमाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरी आणि आय. सी. ए. आय. पिं-चिं शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रशेखर टिळक यांचे “अमृतकाळातील केंद्रीय अर्थसंकल्प” या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा व जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती देणारा अर्थसंकल्प आहे, असे मत अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले. संरक्षण आणी पर्यटन या क्षेत्रातील विविध घडामोडींवर चंद्रशेखर टिळक यांनी आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पिंपरीचे अध्यक्ष रो.प्रशांत शेजवळ, क्लब चे सचिव रो.वैभव गवळी तसेच आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए पंकज पाटणी, माजी अध्यक्ष सीए संतोष संचेती व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन रो. प्रमोद जाधव, सूत्रसंचालन सीए ललित बडगुजर व आभार प्रदर्शन वैभव गवळी यांनी केले.
Please follow and like us:
