47
पिंपरी
पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी परिसरात मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे व चिरे पडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी या खड्ड्यांमुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला असून, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेत, पिंपरी-चिंचवड आम आदमी पक्षाचे सचिव मा. यलप्पा वालदोर यांनी घटनास्थळी जाऊन व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती केली. अपघात होऊ नये म्हणून त्यांनी तात्पुरती उपाययोजना करत रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात झाडाची फांदी टाकून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.
या संपूर्ण परिस्थितीची माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेच्या बीआरटी विभागाला देण्यात आली असून, त्यांच्याकडे तातडीने रस्ता दुरुस्त करून सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आप पार्टीचा इशारा — जर लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी केली नाही आणि भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडली, तर त्याला महापालिका प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील.
पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम आदमी पक्ष कायम आवाज उठवत राहील आणि अशा समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत राहील.
Please follow and like us:
