49
पिंपरी
जे. एस. पी. एम. संचलित ब्लॉसम पब्लिक स्कूल ताथवडे येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे पहिल्या दिवशी अभिनेत्री नम्रता संभेराव, दुसऱ्या दिवशी अभिनेत्री श्रुती मराठे उपस्थित होत्या तर सांगता समारंभ अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थी सोहम कुलकर्णी व तेजस साबळे उपस्थित होते.
“अरुनिमा” या थीमवर आधारित या महोत्सवाने अवघ्या रसिकांचे मन जिंकले. 

पहिल्या दिवशी ‘पूर्व -प्राथमिक’ विभागातील चिमुकल्यांनी आपले कलागुण ऋतूंच्या सोहळ्याद्वारे सादर केले.
यावेळी अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी त्यांच्या भाषणात पालकांना आपल्या मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्या स्वाती आरू यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्री श्रुती मराठे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर सहशालेय उपक्रमांचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राथमिक विभागाने ‘श्रीकृष्ण’ या संकल्पनेवर आधारित कलाकृती सादर केली
‘पुस्तक’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचा सांगता समारंभ तिसऱ्या दिवशी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पुस्तक’ हा खरा मित्र आहे, विविध विषयांवर आधारित पुस्तकांची नाविन्यपूर्ण पद्धतीने ओळख करुन देण्यात आली. आधुनिक युगात तंत्रज्ञान हे सर्वस्व नसून साधन आहे त्याचा योग्य तोच वापर करून पुस्तकांची कास सोडणार नाही या प्रतिज्ञेने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. तानाजी सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय व यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ. पी. पी. विटकर , जे. एस. पी. एम. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवी जोशी, संस्थेचे संकुल संचालक रवी सावंत, शैक्षणिक संकुलाचे सहसंचालक डॉ. सुधीर भिलारे, सचिव गिरीराज सावंत, विश्वस्त ऋषिराज सावंत, शालेय-अभ्यासक्रम सहसंचालिका अमिता कामत व प्राचार्या स्वाती आरू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्या दीपा पवार, सर्व विभागाचे पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या दीपा पवार यांनी केले.
Please follow and like us:
