Home पिंपरी चिंचवड चिखली धनावडेवाडी साकव भूमिपूजन समारंभ आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न 

चिखली धनावडेवाडी साकव भूमिपूजन समारंभ आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
संगमेश्वर
[ विलास गुरव] संगमेश्वर तालुक्यातील चिखली धनावडेवाडी येथे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या साकवाच्या (कॉजवे) कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कामाची ग्रामस्थांनी अनेक दिवसापासुन मागणी केली होती, आणि अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे.
आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करत, या साकवाच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा प्रकल्प मंजूर करून घेतल्यामुळे येथील रहिवाशांना विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणींवर मात करता येणार आहे.
सार्वजनिक हितासाठी विकासकामे हे माझे कर्तव्य – आमदार शेखर निकम
कार्यक्रमात बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, “ग्रामस्थांच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करणे ही माझी प्राथमिकता आहे. चिखली धनावडेवाडी साकवाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे दळणवळण सुलभ होईल. शेतकरी, विद्यार्थी, आणि ग्रामस्थांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल. हा प्रकल्प म्हणजे गावाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
या भूमिपूजन कार्यक्रमात चिखली आणि आसपासच्या गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार मानत, या साकवामुळे वाहतूक आणि दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होणार असल्याचे समाधान व्यक्त केले.
या प्रकल्पामुळे शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण, आणि गावातील सर्वसामान्य दळणवळण सुरळीत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी राजेंद्र सुर्वे, ममता साळुंखे (उपसरपंच, चिखली), दत्ता ओकटे (उपसरपंच, कडवई), पप्पु ब्रीद (सरपंच, तांबेडी), संतोष भडवलकर, राजेंद्र ब्रीद (सरपंच, मारसंग), फैयाज माखजनकर, साहिल कडवेकर, संतोष जाधव, लक्ष्मण मयेकर, विनोद कदम, विजय साळुंखे (गुरुजी), बाळकृष्ण धनावडे, वसंत धनावडे, लिलाधर पंडीत, संजय खातू (माजी सरपंच, चिखली), राजू पाध्ये, उप अभियंता शिवपुसे, सहाय्यक अभियंता गायकवाड, अहिल मयेकर, मयुर भिंगार्डे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते इ. उपस्थित होते.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00