Home पिंपरी चिंचवड कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरीत शब्दांचा जागर

कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरीत शब्दांचा जागर

१८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी-चिंचवड
कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेने १८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथील ‘कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरी’त (महात्मा फुले महाविद्यालय) आयोजित केले होते हे संमेलन रविवारी अतिशय उत्साहात पार पडले.
साहित्याचा जागर, मान्यवरांची उपस्थिती आणि राज्यस्तरीय काव्यस्पर्धेने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.
मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन
संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक मा. दशरथ परब यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्यातील कामगार जाणीवांचा वेध घेतला. संमेलनाध्यक्ष मा. उमेश शंकर गाड यांनी मराठी साहित्याच्या चळवळीवर भाष्य करत नव्या लेखकांना प्रोत्साहित केले. मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर (कवी गोलघुमट) यांनी संमेलनाचे नेतृत्व करत चळवळीची भूमिका स्पष्ट केली.
सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या दिग्गजांना यावेळी सन्मानित करण्यात आले:
जीवनगौरव साहित्य भूषण: मा. उत्तम कांबळे (नाशिक)
समाजभूषण: ॲड. राम कांडगे (चाकण)
विद्याभूषण: डॉ. पांडुरंग भोसले (पिंपरी)
साहित्य भूषण: सौ. अर्चना नितीन मोरे (मूर्तिजापूर), ज्योती अमिने, हेमलता पाटील, प्रितम गाडगीळ, शाम दाभाडे, प्रा. आबा पाटकरी.
काव्यस्पर्धेचा निकाल: प्रा. अंताराम जिभकाटे प्रथम
४४ व्या राज्यस्तरीय काव्य संमेलनांतर्गत रंगलेल्या काव्यस्पर्धेत महाराष्ट्रातून अनेक कवींनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे:
प्रथम क्रमांक: प्रा. अंताराम जिभकाटे (पुणे)
द्वितीय क्रमांक: मंदाकिनी भावे (सांगली)
तृतीय क्रमांक: अश्विनी काळे
उत्तेजनार्थ: योगिता संजय कोठेकर आणि संदीप सूर्यवंशी.
पुस्तकांचे आकर्षण आणि परिसंवाद
संमेलनात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सौ. अर्चना मोरे यांच्या ‘अनुभूती’ या कथासंग्रहासह अनेक पुस्तकांचे रसिकांनी स्वागत केले. दुपारच्या सत्रात ‘दलित साहित्य उपेक्षित का?’ या विषयावर डॉ. निता बोडके यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासपूर्ण परिसंवाद पार पडला. यामध्ये नागपूरवरून आलेले डॉ प्रवीण उपलेंचवर तसेच जळगाव चे बापूसाहेब ठाकरे पाटील यांनी परिसंवादाच्या विषयावर सखोल विवेचन केले दुपारच्या सत्रात झालेल्या काव्य संमेलनाला ज्येष्ठ कवयित्री जयश्री श्रीखंडे या काय संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून तसेच बुलडाणा येथील ज्येष्ठ कवी डी आर बांगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
कार्यक्रमाचे दिलखुलास सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका अनघा जाधव यांनी केले. मुख्य आयोजक डॉ. सुहास निंबाळकर आणि समन्वय समितीने कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, साहित्यिक आणि पिंपरी-चिंचवडमधील रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. नाशिकच्या ज्येष्ठ कवयित्री ललिता गवादे कराडचे ज्येष्ठ कवी सुरेश लोहार डॉ विनायकराव जाधव चाकणचे राम कांडगे अरविंद तुपे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती हे विशेष होय.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00