Home पिंपरी चिंचवड संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई

अनधिकृत बांधकाम केल्यास कारवाई निश्चित; नागरिकांनी नियम पाळण्याचे आयुक्तांचे आवाहन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे ८७५ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत झोपडीचे बांधकाम निष्कासित करण्यात आले.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त अण्णा बोदडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान कार्यकारी अभियंता उमेश मोने, उपअभियंता संदिप पाडवी, महेंद्र देवरे, प्रशांत कोतकर, सुनिल दांगडे, सुनिल हरिदास तसेच कनिष्ठ अभियंते सतीश डांगे, अशोक पाटील, वनिता बवले, योगेश शेवलकर, विशाल नेवाळे, सुरेश लंगोटे, कल्याणी वाघमारे, धनश्री हंडे, ज्योती चांदगुडे, प्रीती बिजवे यांच्यासह बीट निरीक्षक व अतिक्रमण पथक सहभागी होते. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, २० एमएसएफ जवान यांच्या उपस्थितीत तसेच ०४ ब्रेकर, ०२ गॅस कटर व सुमारे ४० मजुरांच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.

यादरम्यान, घटनास्थळी पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी देखील भेट देऊन पाहणी केली आणि कारवाईचा आढावा घेतला. कारवाईदरम्यान पोलीस उपायुक्त संदिप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, १० पोलीस अधिकारी व ५० पोलीस अंमलदार यांच्या चोख बंदोबस्तात ही निष्कासन कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.

महानगरपालिकेच्या जागेवर अथवा झोपडपट्टी क्षेत्रात कोणतेही अनधिकृत बांधकाम करणे हे पूर्णतः नियमबाह्य आहे. अशा प्रकारची बांधकामे सुरू केल्यास अथवा उभारल्यास त्यावर कायद्यानुसार निष्कासन कारवाई करण्यात येईल. शहरातील पुनर्वसन प्रक्रिया आणि नियोजित विकासाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही अनधिकृत संरचनेबाबत महानगरपालिका कठोर भूमिका घेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये व सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.

   डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00