23
निगडी
प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने गेली १० वर्षांत सुमारे वारकऱ्यांना मोफत चहा वाटप करणारे किशोर पवार आणि वारकऱ्यांची मालिश करून सेवा करणारे हभप मच्छिंद्र महाराज पारखी यांना वारकरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री गजानन महाराज समाधी दिन आणि संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवानिमित्त कीर्तन सोहळ्याच्या सांगता प्रसंगी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी भंडारा डोंगर तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद, महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिं- चिं शहराध्यक्ष अध्यक्ष विजय जगताप, विजय भोंडवे, गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष रामभाऊ पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कीर्तन महोत्सवात हभप महेश नेरोडे, हभप मधुकर गोरे, हभप उद्धव महाराज कोळपकर, हभप अर्जुन महाराज फलके, हभप रामलिंग महाराज मोहिते,हभप महावीर महाराज सूर्यवंशी, हभप माऊली आढाव यांनी कीर्तन सेवा दिली तर हभप संतोष महाराज पायगुडे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.
मंदिरात रोज सायंकाळी हरिपाठ, श्रींची आरती, भजन असे अध्यात्मिक कार्यक्रम मंदिरात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ पिसे यांनी केले तर आभार माणिक जाधव यांनी मानले.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी अभय तारक, रवींद्र मिरजी, विजय बेहरे, भाऊसाहेब खडसे, देविदास हरमकर, महादेव कथले, सहदेव जानोरकर,विकास ठाकरे सुरेश गुळवे,गौरव देवरे, राजेश हरमकर, विशाल पिसे,महादेव तारक, माणिक जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
Please follow and like us:
