45
पिंपरी चिंचवड
पुणे जिल्हा परिषद पुणे व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील शाळांचे गुणवत्ता संवर्धन अभियान राबवण्यात आले होते या मध्ये अनेक शाळांनी आपला सहभाग घेतला होता यामध्ये टागोर शिक्षण संस्थेच्या श्री टागोर माध्यमिक विद्यालयाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला तर पिंपरी चिंचवड तालुका गटातून प्रथम क्रमांक येण्याचा मानपटकावला आणि पाचशे ते हजार पट संख्या असलेल्या गटा मध्ये श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर ने पिंपरी चिंचवड विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुणे जिल्हा परिषद पुणेचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी श्री भाऊसाहेब कारेकर व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, संभाजी पडवळ,व सचिव प्रसाद गायकवाड, सुबोध गलांडे यांनी श्री टागोर शिक्षण संस्थेचा पुरस्कार देऊन मानसन्मान केला यावेळी टागोर शिक्षण संस्थेच्या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात आले सदर पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार विठोबा लांडे यांचाही सत्कार या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला यावेळी नंदकुमार लांडे यांनी बोलताना सांगितले टागोर शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षकांनी झोकुन देऊन कार्य केल्याने पिंपरी चिंचवड शहरात या दोन्ही शाळांना पुरस्कार प्राप्त झाला शाळा गुणवत्ता म्हणजे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि एक चांगली शिकण्याची जागा देणे. यात चांगले शिक्षक, योग्य सुविधा, आणि एक सकारात्मक वातावरण यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, शाळा गुणवत्ता म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना भविष्यासाठी तयार करणे.असे मत त्यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रम पुरस्कारावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष काळे,हनुमंत आगे,उद्धव ढोले,मनीषा गुरव, पर्यवेक्षक शिवाजी गुरव व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या पुरस्काराने निश्चितच श्री टागोर शिक्षण संस्थेचे दोन्ही शाळांची जबाबदारी वाढली आहे असे मत संस्थेचे सचिव सुरेश फलके यांनी व्यक्त केले या वेळी भोसरी विभागातून पिंपरी चिंचवड शहरामधून श्री टागोर शिक्षण संस्थेचे सर्व स्तरातून कौतूका चा मोठ्या प्रमाणात वर्षाव होत आहे
Please follow and like us:
