21
पिंपरी
डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डीचे उपप्राचार्य प्रदीप कांबळे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत, बी द चेंज फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार समारंभ साईनगरी, शिर्डी येथे पार पडला.
या प्रसंगी श्री. प्रदीप कांबळे यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल व अनेक आदर्श विद्यार्थी घडविल्याबद्दल गौरविण्यात आले.
श्री. कांबळे यांच्या या यशाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, संकुलाचे संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त), प्राचार्य डॉ. एच. डी. बिरादार तसेच संस्थेतील सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Please follow and like us:
