पिंपरी 
महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर हा दिवस ‘चालक दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड शहरात हा दिवस प्रथमच एका भव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. रिक्षा चालकांच्या अथक परिश्रमाला आणि त्यांच्या प्रामाणिक सेवेला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात, प्रवासी सेवेत सचोटी दाखवणाऱ्या कर्तव्यदक्ष रिक्षा चालकांचा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष सन्मान केला जाणार असून, महाराष्ट्रातील पहिल्या ‘पेट्रोल-टू-इलेक्ट्रिक’ रूपांतरित रिक्षाचेही लोकार्पण केले जाईल.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे श्री. संदेश चव्हाण, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री. विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सतीश नांदुरकर, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे श्री. बापू गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
प्रामाणिकतेचा होणार सन्मान
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, रिक्षा चालकांनी दाखवलेली प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सेवा. ज्या रिक्षा चालकांनी आपल्या गाडीमध्ये प्रवाशांनी विसरलेल्या मौल्यवान वस्तू (उदा. सोने, रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप) व महत्त्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे परत केली, अशा ‘प्रामाणिकतेच्या दूतांचा’ आरटीओ मार्फत अधिकृत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. यासोबतच, दीर्घकाळ सेवा बजावलेल्या ज्येष्ठ रिक्षा चालकांचाही यावेळी सत्कार केला जाणार आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ
इंधन दरवाढ आणि पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमात एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या ‘पेट्रोल रिक्षाचे इलेक्ट्रिक रिक्षात रूपांतर’ रिक्षाला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ती प्रवासी सेवेसाठी समर्पित केली जाईल. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासह रिक्षा चालकांच्या इंधन खर्चात बचत करण्यासाठी एक क्रांतीकारी पाऊल ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
असा असेल कार्यक्रम
कार्यक्रमाची सुरुवात उद्या दुपारी १:०० वाजता  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होईल. यानंतर, रिक्षा चालकांची एक भव्य रॅली मोरवाडी मार्गे काढण्यात येईल. रॅलीचा समारोप पिंपरी येथील अल्पाइन हॉटेल येथे मुख्य कार्यक्रमात होईल.
“पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच साजरा होणारा हा चालक दिवस, हा आपल्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा गौरव आहे. हा आपल्या सन्मानाचा दिवस आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक बांधवांनी मोठ्या संख्येने आणि एकजुटीने उपस्थित राहावे.”
– डॉ. बाबा कांबळे,
संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र रिक्षा पंचायत
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00