Home पिंपरी चिंचवड मराठी माणसाची लढाईत जित तर तहात हार – प्रा नाईकवाडी 

मराठी माणसाची लढाईत जित तर तहात हार – प्रा नाईकवाडी 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

सर्व क्षेत्रात मराठी माणसाने बऱ्याच क्रांतीकारी घटना घडवून सामाजिक स्थित्यंतरे घडवली. तरीपण मराठी माणूस युद्धात जिंकतो पण तहात हारतो. अशी खंत प्रा शंकर नाईकवाडी यांनी केली.

 शरद नगर चिखली येथील स्वामी विवेकानंद यांच्या 162व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवशीय व्याख्यानमालेचे उदघाट्न आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
नाईकवाडी यांनी  “महाराष्ट्रातील समाज जीवनामधील स्थित्यानंतर-   काल -आज  आणि उदया ” या विषयावर पहिले पुष्प गुंफले.
  यावेळी पो निरीक्षक विठ्ठल साळुंके,माजी नगरसेविका मंगलाताई कदम,योगिता नागरगोजे, निलेश नेवाळे, ,मिलिंद वराडकर, सचिन सानप,अध्यक्ष रामराजे बेंबडे हे उपस्थित होते.
प्रा नाईकवाडी पुढे म्हणाले कि,ज्ञानदेवांनी अध्यात्माचा रचला. तुकाराम महाराजांनी दुरजणांच्या माथी काठी हाणू असे म्हंटले पण आज ती काठी हरवली आहे.पुढे शिवरायांनी मराठा सम्राज्य उभे केले.त्यांनी रोज लढाईचे नियोजन केले. मात्र लढाईत महाराज जिंकले मात्र तहात हारले. पुढे भारतात इंग्रज येऊन भारतावर राज्य केले. यावेळी बरेच क्रांतिकारी घटना घडल्या. बरेच भारतीय शहीद झाले.देश स्वातंत्र्य झाला.अशा काळात ही मराठी माणसाला महाराष्ट्र मिळण्यासाठी 105 जणांचे प्राण द्यावे लागले.ती लढाई स्वकी्यांसोबत करावी लागली हे दुर्दैव.
कालांतराने कला, नाट्य, संगीत, सिनेमा समृद्ध असा महाराष्ट्र बनत गेला. त्यातही यशवंतराव चव्हाण साहेबांना पंतप्रधान पदाची संधी असताना उपपंत प्रधान पदावर समाधान मानावे लागले. असे अनेक प्रसंग सांगून मराठी माणसाची पीछेहाट होण्याच्या घटना सांगितल्या.आपल्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असताना देखील कालही मराठी नेते दिल्ली पुढे झुकत होते,आजही तीच स्थिती आहे.आज आपल्याच मराठी मुलखात परप्रांतीय येत असल्याने आपणच  हद्दपार होतो कि काय? अशी भीती वाटू लागली आहे.
आमदार लांडगे यांनी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने स्वामीजींचे विचाराचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगून कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद वेल्हाळ यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश आवटे यांनी तर आभार संतोष ठाकूर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश मांडवकर, अशोक हाडके,दिलीप खंडाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00