56
पिंपरी
पिंपरी चिंचवड अहिर स्वर्णकार समाजाच्या वतीने रविवारी (दि. २६) रोजी स्नेहसंमेलन व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम चिंचवडगावातील रस्टन कॉलनी येथील प्रभू रामचंद्र सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला.
दरम्यान अहिर सुवर्णकार समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत समाज बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात सुनील तुळशीराम सोनार (विसपुते) यांना ‘जीवनगौरव’, दिलीप प्रभाकर रणधीरे यांना ‘उद्योगरत्न’, दीपक मुरलीधर सोनार यांना ‘समाजभूषण’ तर, कु. अनुश्री राहुल वाघ हीस ‘कलाविष्कार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार उमाताई खापरे, शिवसेना चिंचवड विधासभेचे शहर संघटक तथा संस्थेचे उपाध्यक्ष संतोष सौंदणकर, अध्यक्ष भगवान वानखेडे, सचिव गणेश सोनार, खजिनदार शिवाजी सोनार, उपाध्यक्ष प्रवीण सोनार,महिला प्रमुख स्मिता सोनार, सहखजिनदार कैलास पैठणकर, भुवन प्रमुख प्रमोद काशीकर तसेच संस्थेचे सभासद दीपक सोनार, सुनील निकुंभ, प्रवीण दुसाने, अनिता सोनार, माधव दाभाडे, रेखा अहिरराव आणि समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह चित्रकला स्पर्धेत यशस्वी मुलांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाज बांधवांनी एकमेकांना तिळगुळ देत उत्साह द्विगुणीत केला. महिलांनी हळदी कुंकू समारंभात सहभाग घेतला. यावेळी महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Please follow and like us:
