76
पुणे
आताचा जमाना हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत मराठीतील अभिजात साहित्य पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत व त्याकरिता स्मॉल लँग्वेज मॉडेल विकसित करण्यात यावेत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा मंत्रालयाला आज दिल्या.
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा श्री गणेशा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री माधुरी मिसाळ ज्येष्ठ साहित्यिक मधुबंगेश करणे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, मनीषा म्हैसकर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर अदी प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की मराठी माणूस हा संवेदनशील आहे त्यामुळे वाद विवाद संवाद हे होत असतात या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे वाद निर्माण झाले ते केवळ आपण संवेदनशील असल्यामुळे झाले असल्याचे सांगत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे म्हणजे मराठी भाषेला राज्य मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की मराठीला राज्य मान्यता देण्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली मराठी भाषा ही सह्याद्रीच्या कडे कपारीत बोलली जाणारी भाषा आहे कृष्णा कोयना गोदावरी पूर्णा तापी या नद्यांच्या खोऱ्यात बोलली जाणारी भाषा आहे सातपुडा च्या पर्वत रांगेत बोलली जाणारी भाषा आहे चंद्रपूर गडचिरोली या आदिवासी भागात बोलली जाणारी भाषा आहे अजंठा वेरूळ या लेण्यांमधली ही भाषा आहे राज्याला लाभलेल्या 720 किलोमीटरच्य समुद्रकिनाऱ्यावर बोलली जाणारी ही भाषा आहे. आज या संमेलनाच्या निमित्ताने जगभरातून अनेक जण येथे आले असून मराठी आपल्याला जागवायचे आहे मराठी टिकवायचे आहे मराठी समृद्ध करावयाचे आहे यासाठी साद घालण्याकरिता हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
लंडन येथे असलेल्या महाराष्ट्र मंडळ आवश्यक असलेल्या जागेसाठीचा निधी राज्य शासन देणार असल्याचे सांगून दिल्ली येथील मराठी विद्यालय देखील चांगल्या पद्धतीने उभे राहण्यासाठी शासन प्रयत्नशील करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मराठी भाषा ही देशातील सर्व भाषांची जोडली गेली पाहिजे व अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाषांशी जर मराठी भाषा जोडली गेली तर मराठी भाषा ग्लोबल होऊ शकते व मराठी भाषेला ग्लोबल करण्याकरिता प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यावेळी बोलताना म्हणाले की मराठी किंवा मराठी ही संकल्पना केवळ एका जातीपूर्ती मर्यादित नाही तर राज्यातील सर्व अठरापगड जातींसाठी म्हणून हा शब्द वापरला जातो. आज जगभरात मराठी भाषिक पोहोचला असून सिलिकॉन व्हॅली ही मराठी माणसांची झाली आहे आखातातील मसाला किंग संजय दातार मंगेशकर कुटुंबीय भीमसेन जोशी पु ल देशपांडे सचिन तेंडुलकर ही मराठी माणसाची ओळख आहे.
मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाने दिला हे विसरता येणार नाही व नाकारताही येणार नाही.
या विश्व मराठी संमेलनामुळे जुन्या व नव्या पिढीमध्ये पूल बांधण्याचे काम होणार असल्याचे मत व्यक्त करत मराठी मनातील न्यूनगंड काढून टाकण्याचे काम या संमेलनाच्या निमित्ताने होणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले .
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले की नव्या युवा पिढीने मराठी भाषेवर होणारी आक्रमणे ही आक्रमकपणे झोपविण्याची गरज आहे. 

राज्यात ठीक ठिकाणी कवितांचे गाव व पुस्तकाचे गाव उभारण्या संदर्भातही प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की जर कोणी जाणीवपूर्वक मराठी भाषा व मराठी माणसाला त्रास देत असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा जीवनगौरव देऊन पुरस्कार करण्यात आला जगभरातील 25 देशातील महाराष्ट्र मंडळातील सदस्य या संमेलनासाठी उपस्थित राहिले आहेत

सकाळी शोभायात्रेने या संमेलनाचा शुभारंभ झाला यावेळी 104 संस्थांमधील जवळपास आठ हजार वद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती
Please follow and like us:
