Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –  आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –  आमदार शंकर जगताप

पुनावळेतील "७ प्लुमेरिया ड्राइव्ह" सोसायटीत ५७५ किलोवॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेचा विकासमार्ग मजबूत

पिंपरी

पिंपरी चिंचवडमध्ये शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक धोरणांना प्राधान्य देत आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेकडे वाटचाल अधिक गतिमान होत. याच पार्श्वभूमीवर
पुनावळे येथील ७ प्लुमेरिया ड्राइव्ह गृहनिर्माण सोसायटीत उभारण्यात आलेल्या ५७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी (दि ८) रोजी करण्यात आले. ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने हे ठोस पाऊल टाकण्यात आले आहे असेही आमदार जगताप यावेळी म्हणाले.

चिंचवड मतदार संघातील ७ प्लुमेरिया ड्राईव्ह या गृहनिर्माण सोसायटीत उभारण्यात आलेल्या ५७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष डॉ गणेश भामे, सचिव शिवराज हराळे, खजिनदार धनंजय पाठक आणि सर्व फेडरेशन कमिटी तसेच रहिवासी उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, गृहनिर्माण सोसायटी स्तरावर उभारण्यात आलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प शहरातील ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मापदंड मानला पाहिजे. याचा आदर्श शहरातील इतर सोसायटी देखील घेतील असा विश्वास आहे. या प्रकल्पामुळे सोसायटीचा वीज खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सुमारे ९ ते १० लाख रुपयांचे सोसायटीचे वीज बिल आत्ता ५० हजार ते १ लाख पर्यंत येत आहे. यातून भविष्यातील वीज दरवाढीपासून रहिवाशांना दिलासा मिळणार आहे यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळणार आहे. १० एकर परिसरात वसलेल्या आणि ९५० सदनिका व ३ हजार रहिवासी असलेल्या या सोसायटीसाठी हा प्रकल्प दीर्घकालीन ऊर्जा नियोजनाचा भाग असून रहिवाशांच्या लोकसहभागातून साकारलेला हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचे आदर्श उदाहरण ठरत आहे.  अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प शाश्वत विकास आणि आर्थिक बचत या दोन्ही बाबींना पूरक ठरणार आहे.या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होणार असून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात लक्षणीय घट होऊन पर्यावरण संरक्षणाला हातभार लागणार आहे.हरित व स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढल्याने शहराच्या पर्यावरणीय संतुलनाला बळ मिळणार आहे

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या हरित ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा धोरणाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी पुढाकार घेतल्यास शहरे ऊर्जा स्वयंपूर्ण बनू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  दरम्यान या
एकूण खर्च अडीच कोटी रुपये इतका झाला आहे.  ४० लाख रुपयांची सबसिडी मिळाली. तसेच आमदार निधी मधून १० लाख रुपये मंजूर केले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने सक्षम पावले टाकली जात आहे. सौर ऊर्जा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्हा आणि राज्यातील इतर गृहनिर्माण सोसायट्यांसाठी हरित ऊर्जेकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा आदर्श ठरेल. तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीकडे नेणारा प्रभावी टप्पा असणार आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट आणि मेट्रोपॉलिटीन शहराचा मानबिंदू समजले जाते. त्या माध्यमातून पर्यावरण पूरक ऊर्जेच्या दृष्टिकोनातून होणारे असे प्रकल्प नक्कीच इतर अनेक सोसायट्यांना आदर्शवत ठरणार आहेत.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00