Home पिंपरी चिंचवड त्या’ औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?

त्या’ औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?

 भाजपाचे प्रखर हिंदूत्त्ववादी नेते महेश लांडगे यांचा सभागृहात संताप

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

  धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबू आझमी प्रवृत्तीला ठेचून काढा!

पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी
हिंदूस्थानवर क्रुरपणे अमानुष अत्याचार करणारा मुघल सम्राट औरंगजेबने माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर इस्लाम स्वीकारण्यासाठी भिक मागितली होती. त्या औरंग्याचे उदात्तीकरण काय करतो? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबु आझमी सारख्या प्रवृत्तींना सभागृहातच आणि रस्त्यावर ठेचून काढले पाहिजे, असा संताप भाजपाचे प्रखर हिंदूत्त्ववादी नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी भर सभागृहात व्यक्त केला.

महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे क्रूरकर्मा औरंगजेब धार्जिने आमदार अबू आझमी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत. याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या समविचार आमदारांनी आज आंदोलन केले. या आंदोलनामध्ये ‘‘हाल हाल करुन मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा..’’ अशी मागणी करीत आमदार महेश लांडगे सहभागी झाले.

आमदार लांडगे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी या धर्मासाठी मरावे कसे याचा आदर्श अजरामर केला बलिदान दिले त्याग समर्पण केले. ” छावा” चित्रपटाच्या माध्यमातून माझ्या राजाचा जाज्वल्य  इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचला. ज्या माझ्या राजाला औरंग्याने हाल हाल करून मारले त्या औरंग्याचे उदातीकरण करताना अबू आझमी सारख्या धर्मांध लोकप्रतिनिधीला लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न लांडगे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हिंदुत्वाचा पुरस्कार करते. आमचे पंतप्रधान कुंभमेळ्यातील पवित्र स्नान करतात आणि दुसऱ्या बाजूला जगातील आर्थिक महासत्ता बनण्याचा संकल्प ही भारतवासियांच्या मनामध्ये रुजवतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, व्होट जिहाद सारख्या प्रवृत्तींचा एका बाजूला रिमोट करतात आणि दुसऱ्या बाजूला “3 ट्रिलियन इकॉनॉमी” असे महाराष्ट्रासाठी व्हिजनही ठेवतात. आमचे नेते हिंदुत्ववादी सरकार म्हणून लोकांमध्ये विकासाचे मुद्दे घेऊन जातात. पण, तुमचा जन्म केवळ जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी झालेला आहे, अशी जहरी टीका आमदार लांडगे यांनी केली आहे.

आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा…
अबू आझमी सारख्या धर्मांध लोकांमुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. स्वतःच्या भावांची क्रूरपणे  हत्या करून राजा बनलेला तुझा औरंग्या आणि स्वतःच्या भावाच्या पादुका ठेवून रामराज्य करणारा भरत राजा  यात फरक आहे.  धर्मरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत न झुकलेला माझा राजा कुठे? आणि माझा इस्लाम स्वीकारा म्हणून माझ्या राजासमोर भीक मागणारा तुझा औरंग्या कुठे? देशात औरंग्याच्या ज्या काही लाचार अवलादी आहेत. त्याच्यामध्ये एकाने तरी विकासाच्या मुद्द्यावरती भाष्य केल्याचं दिसते का?  प्रखर हिंदुत्वाचा विचार व विकासाचा संकल्प आणि स्वप्न घेऊन काम करणारे माझे हिंदुत्ववादी महायुती सरकार या औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी मी या निमित्ताने सभागृहासमोर करणार आहे, असा घणाघातही आमदार महेश लांडगे यांनी केला.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00