काळेवाडी
शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तापकीर चौक, काळेवाडी येथे सकाळी ८:४५ वाजता या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रम झाले. शिववंदना , गणेश वंदना आणि शिवजन्म सोहळा या विशेष सादरीकरणांनी उत्सवात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी शिवनेरीवर शिवबा जन्मला, पोवाडे, भाषणे, जोगवा, नृत्य आणि ‘शिवराज्याभिषेक’ यांसारखी विशेष सादरीकरणे सादर केली. विशेष आकर्षण: • विद्यार्थी पोवाडा: संध्या मंडलिक, अथर्व पाटील, सार्थक ढेंगळे • गौरव महाराष्ट्राचा आणि ‘आले मराठे’ या नृत्य सादरीकरणांना विशेष दाद मिळाली. • शिक्षिका सौ. सोनाली पतंगे आणि सौ. स्वाती डहाके यांनी प्रेरणादायी भाषणे केली. • शिवाजी महाराजांची आरती करून उत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका जयश्री पवार, संचालिका उल्का जगदाळे, शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन सौ. प्रियंका जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे: • श्री. सोमनाथ दादा तापकीर (अध्यक्ष, ओम साई ग्रुप) • श्री. चंद्रकांत दादा तापकीर (सामाजिक कार्यकर्ते) • श्री. प्रकाश लोहार (सामाजिक कार्यकर्ते) • PSI कामटे साहेब • श्री. उमेश शिंदे (उद्योजक) • श्री. तेजस साळवी, प्रशांत कदम, सुहास सूर्यवंशी, गणेश पवार, सचिन दोरगे स्वप्नील जंगम , ऋषीकेश जुंदरे, संदीप सूर्यवंशी • म्हसोबा देवस्थान अध्यक्ष श्री. शंकर मोटे • पत्रकार महेश मंगवडे (लोकमत) या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन संस्था अध्यक्ष विवेक तापकीर आणि संस्था सचिव मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मल्हारीशेठ तापकीर हे या कार्यक्रमाचे आधारस्तंभ होते.
