8
पिंपरी
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनणार आहे.आधुनिक काळात औद्योगिक क्षेत्रात काम करताना कृत्रिम बुद्धिमत्ताला ( ए आय) हलक्यात घेवून चालणार नाही.या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी एआय तंत्रज्ञान शिकून घेणे अनिवार्य ठरेल. तेव्हा नोकऱ्या टिकून राहतील. कंपन्यामध्ये यंत्र आणि यंत्र मानवासोबत काम करावे लागणार आहे.त्यामुळे आत्ताच एआय चे तंत्रज्ञान आत्मसात करून घ्यावे,असा सूर विविध कंपन्याच्या प्रतिनिधीनी आळवला.
‘सक्षम भारत’च्या वतीने, एचआर इन्फोटेक असोसिएशन, एनआयपीएम आणि सिम्बायोसिस यांच्या सह कार्याने आयोजित केलेली एचआर लीडरशिप परिषदेत २०२५ हा सिम्बायोसिस कॅम्पस, हिंजवडी येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. या परिषदेमध्ये ३०० हून अधिक एचआर लीडर्स, सीएक्सओ आणि शिक्षणतज्ज्ञांनी “एआय युगात मानवी क्षमता सक्षम करणे” या विषयावर चर्चा केली.
यावेळी परिसंवादामध्ये बीएनवायचे व्यवस्थाकीय संचालक सुस्वर गानू, पर्सिस्टंट सिस्टीम्सच्या डाटा,एआय विभाग प्रमुख समीर दीक्षित यांनी कामातील चपळाई, नेतृत्व आणि मानव-कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सहकार्याबद्दल विचार प्रकट केले.
यावेळी संपन्न झालेल्या चर्चासत्रात श्वेतांबरी सलगर, डॉ. विश्वनाथ जोशी, नंदिनी जाधव, सल्लागार अतुलय गोस्वामी, डॉ. अमित आंद्रे आणि अश्विन जयसिंघानी यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले.
सक्षम भारतचे सह-संस्थापक बळीराम मुतगेकर म्हणाले कि,अचानक नोकरी गमावलेल्या प्रतिनिधीसाठी आवश्यकतेनुसार पूर्ण सहकार्य केले जाईल, तसेच औद्योगिक आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील दरी कमी होण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील.
यावेळी अजिंक्य डी वाय पाटीलचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ.संतोष बोर्डे,
औद्योगिक सल्लागार मिलिंद मुतालिक,
सनबीमचे सीईओ नितीन कुदळे,सनबीमचे संचालक अतुल भिंगे, सक्षम पथचे सह संस्थापक अमोल कागवडे, अजित देसवांदिकर, सचिन ढोकळे,आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ अभय कुलकर्णी,संजय धायगुडे,डॉ कमलजीत कौर,
डॉ माधव राऊळ,वैशाली दरडे,स्वाती मोरे,वर्षा राऊत,निरंजन काळे, मयूर अत्रे,मधुकर सूर्यवंशी, राहुल निंबाळकर,परेश शाह, अर्चना शेवकरी,संपत पारधी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सिम्बॉयसीसच्या डॉ. नेत्रा नीलम, इन्फोटेकचे करण राजपाल आणि एन आयपीएमचे प्रदीप मानेकर यांनी आपल्या संस्थांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरज शर्मा आणि अंकिता गुप्ता यांनी केले.तर आभार मिली संदीप यांनी मानले.
Please follow and like us:
