(अविनाश देशमुख शेवगांव)
शेवगांव: गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्स् प्रा. ली. हरिनगर, नजिक बाभुळगांव या साखर कारखान्याचा 14 वा गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे अण्णा यांचे मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक रणजीत मुळे व कारखान्याचे संचालक व अजित सिड्स प्रालि चे कार्यकारी संचालक समीर मुळे, पार्थ मुळे, तांत्रिक सल्लगार एस. एन. थिटे व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यांचे उपस्थितीत श्री. व सौ शारदा आसाराम मडके, सिनिअर ऍग्री ओव्हर्सिअर यांचे शुभहस्ते गव्हाण व मोळीची विधिवत पूजा करून संपन्न झाला. कार्यक्रमास कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी विलासराव ढोरकुले, रणजित घुगे, गंगामाई इंटर कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि. आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी संजय टाकळकर, अरुण घाडगे, संभाजी घनवट, महादेव घनवट, बाबासाहेब गर्जे, शाम साळवे, सुरेश कटारिया, कृष्णा ढोरकुले, भाऊसाहेब ढोले मामा, दिपक घनवट, अर्जुन ढोरकुले, नामदेव घनवट, घनवट मेजर, प्रकाश घुगे, लक्ष्मणराव टाकळकर, संदीप घाडगे, सोपानराव ढोरकुले, मच्छीन्द्र ढोरकुले, तुकाराम थोरवे, दामुआण्णा घुगे, रामजी क्षीरसागर, शिवाजी क्षिरसागर, विष्णु ढोरकुले, कृष्णा क्षिरसागर, राम पिसोटे तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
गाळप हंगाम 2024-25 करिता तोडणी वाहतूक यंत्रणा व इतर सर्व तयारी पूर्ण झालेली असून शासनाचे नियमानुसार प्रत्यक्ष गाळप सुरू करण्यात येईल. सर्वांनी आपला ऊस कारखान्यास गाळपास देऊन सहकार्य करावे, उसाचे नोंद व तोडणी साठी शेतकी विभागाशी संपर्क करावा. यावर्षी जायकवाडी धरण 100 टक्के भरलेले आहे त्यामुळे पुढील हंगामासाठी उसाचे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने सर्वांनी ऊस लागवड करताना शेतकी विभागाशी संपर्क करून नोंद लावून घ्यावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यापूर्वी अतिरीक्त ऊस असलेले गाळप हंगामात गंगामाई कारखान्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे वेळेत गाळप केलेले आहे. या हंगामामध्ये कार्यक्षेत्राबाहेरील कारखाने जादा भावाचे आमिष दाखवून ऊस मिळण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु गंगामाई कारखान्याने नेहमीच परिसरातील शेतकऱ्यांचा ऊसास गाळपासाठी प्राधान्य दिलेले आहे. त्यामूळे या हंगामातही आपले कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट
पुर्ण करण्यासाठी सर्वानी आपला ऊस गंगामाई कारखान्यास देऊन सहकार्य करावे. या हंगामात गंगामाई कारखाना परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देणास कुठेही कमी पडणार नसल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित भैय्या मुळे यांनी सांगितले.
कारखान्याचे बेणे मळ्यात सुधारित ऊस जातीचे जादा ऊस उत्पादन व लवकर परिपक्व होणारे पी.डी.एन. -15012, पी.डी.एन. – 15006, पी.डी.एन. -13007 व को.व्ही.एस.आय. – 18121, या ऊस जातीचे उसाची रोपे व ऊस बेणे उपलब्ध करण्यात आली आहेत. बेणे व रोप मागणी करीता कारखान्यांचे शेतकी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले. उपाध्यक्ष व्हि. एस. खेडेकर यांनी उपस्थित सर्वांचे कारखाना व्यवस्थापनाचे वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.
कारखाना स्थापन झाल्यापासून सातत्याने साखर उत्पादन वाढत असुन पंचक्रोशीत वायु प्रदुषण पाणी प्रदुषण व कारखान्याच्या वजन काट्यात शेतकऱ्यांच्या मापात पाप करण्याचे आरोप सातत्याने होत आहेत यावर कारखाना व्यवस्थापन काय उपाय योजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
