Home ताज्या घडामोडी ज्ञानाई सावित्रीमाईचा जन्मदिन ३ जानेवारी सपूर्ण भारतभर महिला शिक्षक दिन व महात्मा फुले यांचा जन्मदिन ११ एप्रिल शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा – प्रा.सुकुमार पेटकुले

ज्ञानाई सावित्रीमाईचा जन्मदिन ३ जानेवारी सपूर्ण भारतभर महिला शिक्षक दिन व महात्मा फुले यांचा जन्मदिन ११ एप्रिल शिक्षण दिन म्हणून साजरा व्हावा – प्रा.सुकुमार पेटकुले

बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास तेलगांना चे सत्यशोधक प्रा. सत्यशोधक पेटकुले यांची भेट व ते फुले एज्युकेशन तर्फे सन्मानित 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पुणे
 फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या वडगांव धायरी येथे नुकतेच बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास तेलगांना राज्याचे  अखिल भारतीय माळी महासंघ अध्यक्ष  सत्यशोधक प्रा .सुकुमार पेटकुले व ज्येष्ठ विचारवंत,कवी मधु बावलकर आणि किनवटचे जेष्ठ कवी अशोक वसाटे तसेच  पिंपरी चिंचवड चे भाऊसाहेब कदम यांनी  ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त भेट दिली. या वेळी प्रथम प्रा.सुकुमार पेटकुले मा.मधु बावलकर यांचे  शुभहस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि  सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तर संस्थापिका सत्याशोधिका आशा ढोक यांनी  ज्ञानज्योती  सावित्रीबाई फुले जीवनचरित्र ग्रंथ भेट दिले.
यावेळी ढोक म्हणाले की प्रा.पेटकुले यांनी तेलगांना राज्यात प्रथम सत्यशोधक विवाह लावण्याची संधी आमच्या संस्थेला  दिली आणि पुढे त्यांनी त्यांचे घरातील उच्चशिक्षित मुलाचे व मुलीचे सत्यशोधक विवाहाची माहिती पुस्तिका मराठी व तेलगु भाषेत २००० प्रतीचे वाटप करून अंधश्रद्धा, कर्मकांड,मुहूर्त याला फाटा देत सत्यशोधक विवाह लावला. विशेष म्हणजे त्या विवाहामध्ये फुले आंबेडकर गीतांचा बहारदार कार्यक्रम आणि त्या गायक गायिका कडून महात्मा फुले रचित मंगलाष्टके गायल्याने विवाहाची मोठी  उंची वाढली होती. पुढे त्यांनी दुब्बागुडा येथे सत्यशोधक विवाह लावण्याची संधी आणि फुले दांपत्य यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा बहुमान देखील शिवदास महाजन व मला  दिल्याचे सांगितले.पुढे ढोक म्हणले की पेटकुले यांनी फुले दांपत्य यांची तेलगु भाषेत पुस्तके प्रकाशित करून लवकरच ते महात्मा  फुले समग्र वाड्मय तेलगु आणि हिंदी भाषेत प्रकाशित करणार आहोत. त्यांनी शाळेतील विध्यार्त्याना प्रेरणा मिळावी म्हणून फुले दांपत्य यांचे जीवनावरील प्रश्न आधारित कोण बनेगा करोडपती  या धर्तीवर लाखोंचे बक्षिसे वाटप केली.तसेच ते  तेलगू भाषेत महात्मा फुले एक पात्री नाटक  सादर करीत असतात .त्यांचे या कार्यामुळे व प्रयत्नामुळेच नुकतेच तेलगांना सरकारने  सवित्रीमाईचा जन्मदिन ३ जानेवारी २५ पासून महिला स्री शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला.
याप्रसंगी पेटकुले म्हणाले की फुले दांपत्य यांनी या पुण्यनगरीत मानवतेची व समानतेची बीजे पेरली त्या नगरीत त्यांनी प्रथम ज्ञानदानाचे व  सामजिक क्षेत्रातील विविध प्रकारचे कामाची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी  महाराज यांची रायगडावरील समाधी शोधून प्रथम १० दिवसाची शिवजयंती सोहळ्याची सुरुवात करीत त्यांचेवर पहिला पोवाडा लिहिला. शेतकऱ्याचा आसूड आणि गुलामगिरी व इतर  पुस्तके लिहून अर्धांग वायुचा झटका आले नंतर देखील अंधश्रद्धा, कर्मकांड यामध्ये भीती पोटी अडकलेला समाज बाहेर काढण्यासाठी डाव्या हाताने सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिहून सर्वाना  प्रबोधनाचे धडे दिले, चूल मुल यामध्ये अडकलेल्या  महिलांना प्रथम शिक्षण सुरु करून ज्ञानाचे कवाडे उघडी केली अशा महान महात्म्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी आमच्या राज्याने प्रथम महिला स्री शिक्षक दिन मोठ्या दिमाखात सपूर्ण तेलगांना राज्यात साजरा केला.
तो ३ जानेवारी शुभ दिन भारत सरकारने सर्व राज्यात व देशात सुरु करावा व येणारा ११ एप्रिल महात्मा फुले यांचा जन्मदिन देखील  “ शिक्षण दिन “ म्हणून साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली .
याप्रसंगी जेष्ठ विचारवंत बावलकर म्हणाले की फुले दांपत्या यांनी विविध कार्य आपले घरातून सुरु केले तसे सत्यशोधक विवाहाचे कार्य ढोक परिवार आपले घरातून  व इतरत्र पूर्णपणे मोफत उत्तम प्रकारे लावत आहेत आणि आम्ही तेलगाना राज्यातील विवाहाचे साक्षीदार आहोत.आपले कार्य देखील असेच  उंचावत जावो असा शुभ आशीर्वाद कुटुंबाला दिला . शेवटी आशा ढोक यांनी सत्याचा अखंड गायला तर आकाश- क्षितीज ढोक यांनी आभार मानले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00