Home पिंपरी चिंचवड नदीचा गळा घोटून कसला आलाय नदी सुधार – रविराज काळे

नदीचा गळा घोटून कसला आलाय नदी सुधार – रविराज काळे

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरसाठी मुळा नदी हि महत्वाची नदी आहे परंतु याच मुळा नदीमध्ये गेली तीन महिन्यांपासून महापालिकेने शहराचे सांडपाणी सोडले आहे. ज्याने या नदीचे पावित्र्य घालविले असुन यासंदर्भात आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी याबाबत आवाज उठवल्यावर महापालिचे अधिकारी कुलकर्णी साहबांनी स्वतः याबाबत खुलासा करून हि गोष्ट मान्य केली असल्याने याबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. नदीमध्ये सोडलेल्या सांडपाण्याने नदीतील मासे मरून पडले ते मासे अधिकाऱ्यांना भेट म्हणून दिले तरीसुद्धा अधिकारी मस्तवालपने वागत असुन अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे नदीमध्ये जे पाणी सोडलं आहे ते स्वच्छ करून सोडलं जात आहे हे कितपत खरं आहे? हा संशोधणाचा विषय आहे. जबाबदार असलेलं पालिकेचे संजय कुलकर्णी हे मूग हिळून गप्प असुन आपल्या पदाचा स्वतःचे खिसे भरण्यासाठी उपभोग घेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. नदीतील वाढलेली जलपर्णी देखील आम्ही काढली याबाबत महानगरपालिकेचे अधिकारीदेखील साधे विचारपूस करायला आले नाहीत.हि लाजिरवाणी गोष्ट असुन या अधिकाऱ्यांना एवढा मस्तवालपणा कुठून आला हा मोठा प्रश्न आहे?
राज्य आणि केंद्र सरकार महापालिकेला सोबत घेऊन नदीसुधार प्रकल्प राबवित असते असे असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील मस्तवाल अधिकारी शहरतिक नदिला विद्रुप करण्याचे काम करत असुन याबाबत
एकीकडे नदीसुधार प्रकल्प राबवायचे आणि दुसरीकडे नदीलाच अशुद्ध करायचा हा गोरखधंदा पिंपरी चिंचवड महापालिकेने चालवीला असून याविरोधात आम आदमी पार्टी पुढील काळात उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असुन याबाबत महापालिकेला जाब विचारणार आहे.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00