47
पिंपरी
महाराष्ट्राचे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू करुन मराठी पत्रिकारितेची मुहुर्तमेढ रोवली. दरवर्षी ६ जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गणेश मोकाशी व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.
तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्षपदी गणेश मोकाशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल आणि महापालिका जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे विशेष कौतुक करण्यात आले त्यामुळे अध्यक्ष अनिल वडघुले यांना देखील पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार विनय सोनवणे, माऊली भोसले, रामकुमार शेडगे, सागर सूर्यवंशी, पराग डिंगणकर, अशोक कोकणे, संतोष गोतावळे, सचिन पाटील आदी उपस्थित होते
Please follow and like us:
