52
पिंपरी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनने तीन आणि चार जानेवारीला आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय शाश्वतता उद्दीष्टे चिंतन परिषदेमध्ये रिमोट केंद्र म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. एकुण १५ रिमोट केंद्रांपैकी पुण्यातून एकमेव केंद्र एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज येथे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले. इंदलकर यांनी १७ शाश्वतता उद्दीष्टे आणि भारतातील त्यांची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली.
प्रभारी प्राचार्य आर्किटेक्ट शिल्पा पाटील यानी संशोधन टीम आणि विद्यार्थी परिषेदेच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने स्वच्छ उर्जा, शाश्वतता शहरे आणि हवामान कृती यासारख्या महत्वाच्या विषयावर केलेले कार्य याबाबत माहिती दिली.
आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या परीषेदेने शाश्वततेच्या दिशेने प्रयत्नशिल पावले उचलण्यावर भर दिला आणि स्थानिक समुदायात जनजागृती केली.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुत्रसंचालन प्रा. अनुजा सिंग यांनी केले
Please follow and like us:
