11
प्राधिकरण, निगडी
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे प्रकाशित पिंपरी चिंचवड वैभव या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी ग दि माडगुळकर सभागृह २ येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री मा.वर्षा उसगावकर यांचे हस्ते झाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष मा.भाऊसाहेब भोईर , डॉ.अभय कुलकर्णी,प्रा.अशोककुमार पगारिया, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रसिद्ध लेखिका विनीता ऐनापुरे यांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन कार्यक्रम पुढे सुरू झाला.दीपप्रज्वलनानंतर गायिका रिचा राजन लाखे यांनी सुरेल आवाजात भक्तीगीत सादर केले.
पद्मश्री नंदकुमार कपोते यांचे शिष्य रफिक मुजावर यांनी नृत्यातून गणेश वंदना करून मंत्रमुग्ध केले.
मा.राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले तर मा.संभाजी बारणे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना आभारप्रदर्शन केले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात १०कवी कवयित्री यांचा सन्मान मा . वर्षां उसगावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुस्तकाची प्रत देऊन करण्यात आला. प्रा.सुरेखा कटारिया, सौ.माधुरी डिसोजा, मा.मंगला पाटसकर, सीताराम नरके यांचा समावेश होता.
या नूतन प्रकाशित काव्यसंग्रहाची संकल्पना श्री.संभाजी बारणे यांची असून प्रस्तावना पिंपरी येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांनी लिहीली आहे.९६ कवींच्या कविता यात आहेत.
Please follow and like us:
