पिंपरी चिंचवड
१६ ते २० डिसेंबर या कालावधीत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, दोरी उडी, धावणे शर्यत, कॅरम, बुद्धिबळ, धनुर्विद्या अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून बक्षिसे पटकावली.
२१ डिसेंबर २०२४ रोजी या क्रीडा महोत्सवाची सांगता पार पडली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू, पंच संतोष म्हात्रे उपस्थित होते. तसेच शाळेच्या सचिव- मुख्याध्यापिका सौ. रजनी वाघमारे, संचालक, दत्तात्रय नेवाळे, पांडुरंग वाघमारे, नीलकंठ वाघमारे, विष्णु मांजरे, निवृत्त मुख्याध्यापक सी. टी. कदम , क्रीडा शिक्षक अनुराग मलगे, सर्व शिक्षक वर्ग व पालक वर्गदेखील उपस्थित होते.
प्रमुख पाहूणे संतोष म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
तसेच यावेळी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप २०२४ गोवा येथे दि. ७ व ८ डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या स्पर्धांमधील शाळेचे विजयी विद्यार्थी पिंपरी चिंचवड संघ, पुणे द्वितीय क्रमांक यांना देखील पुन्हा गौरविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, तसेच कांस्य पदके जिंकली. यामध्ये तन्वी सूर्यवंशी, जानवी सूर्यवंशी, आयेशा, मुस्कान शेख, प्रज्ञेश पाटील तसेच मोरया विधाते (सर्वोत्तम खेळाडू) यांचा समावेश होता.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेलाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी आर्या गाडे व आदित्य चौधरी यांनी केले. शाळेच्या शिक्षिका सौ. कविता गायकवाड यांनी आभार मानले.
