Home पिंपरी चिंचवड नदी सुधार प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

नदी सुधार प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

 पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका नदी सुधार प्रकल्प समन्वयाने राबवत आहेत. हा प्रकल्प राबवत असताना मुळा व मुठा नदीवरील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या,  नदी स्वच्छताजलप्रवाहातील अडथळे दूर करण्यासह पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टिने उपाययोजना राबवाव्यातसर्व विभागांनी यापूर्वीसारखेच समन्वय ठेवून काम करावेत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

 पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील मुळामुठापवना आणि इंद्रायणी नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पांबाबत आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)जलसंपदा विभागकेंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) अशा नदी सुधार प्रकल्पासंबंधित सर्व शासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य इमारतीतील कै. मधुकर पवळे सभागृह येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

 बैठकीला राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम,पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंहपीएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला,पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी.पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलविजयकुमार खोराटेतृप्ती सांडभोरशहर अभियंता मकरंद निकमसहआयुक्त मनोज लोणकर,  मुख्य अभियंता संजय कुलकर्णीमुख्य अभियंता दिनकर गोजारेवन विभागाचे प्रादेशिक उपवनसंरक्षक महादेव मोहितेजलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुनालेडॉ. हेमंत धुमाळकार्यकारी अभियंता दि. म. डूबलसीएमईचे कर्नल प्रभात सिंगजलविज्ञान तज्ज्ञ अविनाश सर्वेकेंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राचे संचालक श्री शैलमशास्त्रज्ञ अनिलकुमार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

 संगणकीय सादरीकरणाद्वारे मुळा नदीवर राबवण्यात येणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण बैठकीमध्ये करण्यात आले. हा आराखडा राबवताना जलसंपदा विभागाच्या सूचनांचा प्राधान्याने विचार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते म्हणाले,  बदलते वातावरणनद्यांना येणारा पूरनदीपात्राची रुंदीघाटमाथ्यावर आणि शहर परिसरात पडणाऱ्या पावसाची आकडेवारीअशा सर्व बाबी विचारात घेऊन भविष्यातील परिस्थितीच्या दृष्टीने प्रकल्पाची आखणी करावी. जैवविविधतापर्यावरण समतोल आणि वाढते नागरीकरण याची सांगड घालून सर्वसमावेशक नदी सुधार प्रकल्प राबवण्यासाठी दोन्ही महापालिका समन्वयाने काम करीत आहेत. त्यांनी समन्वय प्रकल्प पुर्णत्वास जाईपर्यंत कायम ठेवावाअसेही ते म्हणाले. नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही तसेच कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीला सामोरे जावे लागू नयेयासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबवाव्यातअसे निर्देशही त्यांनी दिले.

लघुउद्योजकांच्या प्रश्नांवर चर्चा

 पिंपरी चिंचवड शहरातील लघुउद्योजकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत देखील बैठक आज पिंपरी चिंचवड महापालिकेत पार पडली. या बैठकीला राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेपिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंहपीएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगलासहआयुक्त हिंमत खराडेमहावितरण मुख्य अभियंता सुनील काकडेपुणे महापारेषण परिमंडल मुख्य अभियंता अनिल कोलपएमआयडीसी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसेमुख्य अभियंता कैलास भांडेकरप्रादेशिक अधिकारी नितीन गवळीअर्चना पठारेमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ पुणे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडेउपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधवपिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरेमाजी आमदार विलास लांडेमाजी महापौर योगेश बंड यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तसहआयुक्तविविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये कुदळवाडीचिखली परिसरातील लघुउद्योजकांची आहे तीच जागा विकसित करून औद्योगिक पार्क बनविणेउद्योजकांना देण्यात आलेल्या सर्व एलबीटी नोटिसा रद्द करणेटी २०१ पुनर्वसन प्रकल्पसीईटी प्लांट व घातक कचरा विल्हेवाट लावणेऔद्योगिक परिसरात रस्ते व भुयारी गटार योजना राबवणेसहा नवीन सबस्टेशन उभारणीसाठी एमआयडीसीमध्ये महावितरणला भूखंड उपलब्ध करून देणेवाढत्या अनधिकृत झोपडपट्टी व वाढती अनधिकृत भंगार दुकाने बंद करणेनाला अतिक्रमण हटवणेसेवा शुल्कवाढ रद्द करणेलघुउद्योजकांच्या संघटनेसाठी वृक्षलागवड व संवर्धनासाठी भोसरीचिंचवडपिंपरी येथे भूखंड उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00