Home ताज्या घडामोडी शिवसेनेतर्फे डॉक्टर व वैद्यकीय सेवकांचा  ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने गौरव

शिवसेनेतर्फे डॉक्टर व वैद्यकीय सेवकांचा  ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने गौरव

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

शिवसेना आणि कामशेत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अंजनाताई डॉ. विकेश मुथ्था यांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टर व वैद्यकीय सेवकांचा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘जीवन रक्षक’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. चोवीस तास रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील परिचारिका, वॉर्ड बॉय, आया, मावशीच्या कामाचे खासदार बारणे यांनी कौतुक केले.

यावेळी डॉ. सत्यजित वाढावकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी, लोकमान्य रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमाकांत गलांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना जिल्हा संघटिका शिलाताई भोंडवे, मावळ लोकसभा युवासेना अध्यक्ष विशाल हुलावळे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख सुदर्शन देसले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राम सावंत, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, नवनाथ हरपुडे, कामशेत शिवसेना शहर प्रमुख सतीश इंगवले उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरातील नामांकित डॉक्टर भूलतज्ञ डॉ.नरेश चव्हाण, सर्जन डॉ.आदित्य यादव, मेंदू व मनका तज्ञ डॉ.मोहनीस दिघे, जनरल सर्जन डॉ.तोशित लोन, जनरल सर्जन डॉ.नितेश जैस्वाल, न्युरो सर्जन डॉ.सुनील वाघवे,भूल  तज्ञ डॉ.बिना जैन, अस्थिरोग तज्ञ डॉ.अभिजित मोरे,  फिजिशियन डॉ.शैलेश अडवाणी, जपनोस्टिक किरण किल्लावाला, रक्तपेटी प्रवीण नवले यांचा गौरव करण्यात आला. रुग्णवाहिका सेवेबाबत विकास वायकर

राजेश भालेराव, पिंटू मानकर, राजेश भालेराव यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करतात. त्यांच्या कामांची दखल घेतली जात नाही. डॉक्टर मानव जातीची सेवा करतात. रुग्ण आल्यानंतर रात्री-अपरात्री रुग्णालयात जावे लागते. कोरोना कालावधी डॉक्टरांनी जीवाची बाजू लावून रुग्णांची सेवा केली. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांचे शिवसेनेतर्फे कौतुक करण्यात आले. याचा आनंद होत आहे. काही जणांमुळे वैद्यकीय क्षेत्राला गालबोट लागले जाते. या क्षेत्रातील जेष्ठांनी पुढाकार घेऊन ते टाळावे, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले आहे.

डॉ. विकेश मुथ्था यांचा विशेष गौरव

तन्मय ठानगे व प्रशांत बने यांचा कामशेतजवळ भीषण अपघात झाला होता. सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक बसली होती. ट्रकमधील सळई शरीरात आरपार गेली होती. डॉ. विकेश मुथ्था यांनी तातडीने उपचार सुरू केले. सलग १४ तास शस्त्रक्रिया केली आणि दोघांना जीवनदान दिले. दोन्ही रुग्ण अतिशय गरीब घरातील होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली. या दोघांना जीवनदान देणारे डॉ. विकेश मुथ्था यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचाही सन्मान करण्यात आला. त्यांना ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00