Home ताज्या घडामोडी पिंपरी-चिंचवडच्या ‘शाश्वत विकास’साठी एक मत मोलाचे!

पिंपरी-चिंचवडच्या ‘शाश्वत विकास’साठी एक मत मोलाचे!

 महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांचे आवाहन  

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

  मतदार संघात ‘२० कलमी निर्धार’ संकल्प पत्राचे प्रकाशन

पिंपरी-चिंचवड 

पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत विकासाचा संकल्प केला असून, त्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या निमित्ताने ‘२० कलमी निर्धार’ कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांचे एक-एक मत मोलाचे आहे. १० वर्षांत केलेली विकासकामे आणि सोडवलेले प्रलंबित प्रश्न आणि हाती घेतलेले महत्त्वकांक्षी प्रकल्प शहराला ‘विकासाचे रोलमॉडेल’ बनेल, असा विश्वास भाजपा- शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे भोसरी मतदार संघातून भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते चिखली येथील जाहीर सभेत संकल्प पत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांच्यासह महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकल्प पत्रात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातील अडीच वर्षांचा कालावधी वगळता शहर प्रगतीच्या दिशेने झेपावत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता असताना अनेक प्रकल्प रखडले, प्रलंबित प्रश्न लांबणीवर पडले आणि विकासकामांचा निधी अक्षरश: अन्य कामांकडे वळवण्यात आला. ‘‘महिलांना सक्षम बनवणे…’’ हा महायुती सरकारचा प्रमुख अजेंडा आहे. त्यासाठीच ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’’ राबवण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून आपल्या भोसरी मतदार संघामध्ये सुमारे ६७ हजार माता-भगिनींना लाभ मिळाला आहे. महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये सन्मान निधी मिळत आहे. यासह शेतकरी, कष्टकरी, नोकरदार आणि व्यावसायिक बांधवांसह सर्व जाती-धर्मातील समाजघटकांच्या हितासाठी ‘शेवटच्या घटकाचा विकास’ या भावनेतून महायुती सरकार काम करीत आहे.

आता विकासाचे रोल मॉडेल पिंपरी-चिंचवड…

महायुती सरकारच्या धोरणात महाराष्ट्र राज्य आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सेमी कंडक्टर आणि हरित उर्जा प्रकल्पांमुळे देशात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात होते आहे, अशी निश्चितच आश्वासक बाब आहे. गेल्या १० वर्षांमध्ये मी पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला. भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये केलेल्या विकासकामांमुळे आजच्या घडीला ‘चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर’ विकसित झाला आहे. विकासाची ही गती आणि प्रगती कायम ठेवल्यास पिंपरी-चिंचवड शहर राज्यातच नव्हे, तर देशात विकासाचे ‘रोल मॉडेल’ म्हणून अग्रगण्य राहील, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

… असा आहे २० कलमी निर्धार कार्यक्रम!

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्प पत्रामध्ये २० कलमी निर्धार कार्यक्रमाचा समावेश आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शिक्षणाच्या नव्या संधी, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, उद्योग धंदे- व्यवसायांना ‘रेड कार्पेट’, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण, वीज पुरवठा आणि वाहतूक कोंडीमुक्त मतदार संघ, आरोग्य व वैद्यकीय सेवा सक्षमीकरण, साहित्य व सांस्कृती जतन, कामगार सुविधा आणि रोजगाराच्या संधी, गतीमान प्रशासन, उद्यान व निसर्ग परिसंस्था जतन, सेवा-सुरक्षा आणि समर्पण, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा, शेती-माती-संस्कृतीचा वारसा आणि देव-देश-धर्माभिमान यासह सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याची ‘गॅरंटी’ आमदार महेश लांडगे यांच्या संकल्प पत्रात आहे. विशेष म्हणजे, महिला सक्षमीकरण व एक हात मदतीचा अशी सामाजिक बांधिलकी आणि ‘व्हीजन पिंपरी-चिंचवड’ असा व्यापक आणि दूरदृष्टीचा निर्धार आमदार लांडगे यांनी केला आहे.

‘‘विधानसभा निवडणूक केवळ व्यक्तीकेंद्रीत मुळीच नाही…’’  ही निवडणूक पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी ज्या महायुती सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काला न्याय दिला. त्या भाजपा- महायुतीचे हात राज्यात बळकट करण्यासाठीची ही निवडणूक आहे. देव-देश अन्‌ धर्माभिमानाचा विचार तेवत ठेवण्यासाठी आणि शेती-माती-संकृतीसाठी अविरत सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळावी. महायुतीसोबत पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाचा २० कलमी कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी समर्थन द्यावे. मोठ्या संख्येने बाहेर पडावे आणि १०० टक्के मतदान करुन महायुती आणि पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान विजयी करावा, असे आवाहन करतो.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार, भाजपा महायुती.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00