पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ५३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग, अशा एकूण ६२ मतदारांच्या गृह मतदानासाठी ३ पथकांची नियुक्ती केली असून, १० ते १२ नोव्हेंबर २०२४ या तीन दिवसांत गृह मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी कळवली आहे.
गृह मतदान पथकात एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, पोलिस कर्मचारी, शिपाई, व्हिडीओग्राफर व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना पुणे महानगपालिकेचे विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर, पुणे येथे ६ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.श्री.स्वप्नील मोरे, जिल्हा समन्वय अधिकारी महेश सुधळकर,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले,अमोल पवार, नायब तहसीलदार श्रीमती जाई कोंडे तसेच पोस्टल बॅलेटच्या नोडल अधिकारी श्रीमती मोनिका कावळे यांनी मार्गदर्शन केले.
*१९ उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी*
भारत निवडणूक आयोगाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च पर्यवेक्षक उमेश कुमार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय – पुणे महानगपालिकेचे विठ्ठल तुपे नाट्यगृह, हडपसर, पुणे येथे उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी केली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे,जिल्हा समन्वय अधिकारी महेश सुधळकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले, अमोल पवार, श्रीमती जाई कोंडे तसेच सर्व विभागाचे नोडल अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक – श्रीमती सुषमा पाटील, राकेश रंजन, जिल्हा स्तरीय सहायक खर्च निरीक्षकविकास खामकर, सुभाष पाडेकर, श्रीमती वनिता बाविसकर, नोडल अधिकारी – उमेदवार खर्च ताळमेळ समिती, उमेदवार खर्च ताळमेळ समितीमधील सर्व सदस्य, उमेदवार व १९ उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.
खर्च पर्यवेक्षक श्री.उमेश कुमार यांनी उमेदवारांना खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना देऊन शंकांचे निरसन केले. तसेच निवडणूक खर्चाबाबत काही शंका अथवा तक्रारी असल्यास त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ७७६८०३६२३० वर संपर्क साधून अथवा मेसेजव्दारे शंकांचे निरसन करावे, असे सांगितले.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी दि. १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. या दोन्हीही दिवशी सर्व १९ उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी यांना निवडणूक कार्यालयात उपस्थित राहणेबाबत सूचना देण्यात आल्या.
000
