Home ताज्या घडामोडी मतदान यंत्रे कमिशनींग व पेअरींग प्रक्रिया सुरु

मतदान यंत्रे कमिशनींग व पेअरींग प्रक्रिया सुरु

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पुणे:- चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रे तयार करण्याच्या (कमिशनिंग आणि पेअरिंग) प्रक्रियेला सुरुवात झाली. थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमचे पोलीस बंदोबस्तात उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत सील उघडण्यात आले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी तथा स्ट्रॉंग रूम व मतमोजणी समन्वय अधिकारी प्रशांत आवटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशा होळकर, किशोर ननवरे यांच्यासह संबधित कक्षाचे समन्वय अधिकारी या यावेळी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ११ नोव्हेंबर,२०२४ पर्यंत मतदान यंत्रांच्या कमिशनिंग आणि पेअरिंगची प्रक्रिया सुरू राहणार आहे. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक सर्व प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागाच्या प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध कामकाज सुरु असून उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना या प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.

उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली आणि सुरक्षेचा आढावा घेऊन संबंधित समन्वय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

*उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी संपन्न*

भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील बापुजी बुवा सभागृहात निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक खर्च निरीक्षक पवन यादव यांच्या उपस्थितीत पार पडली. ही तपासणी तीन टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर रोजी आणि तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली. दुसऱ्या आणि तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पवार यांनी सर्व उमेदवारांना केली आहे.
०००

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00