पिंपरी 
 माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी जानेवारी २०२४ ते अजातगायत  प्रशासकीय  कामकाजात अनेक  गंभीर अनियमितता केली आहे. यामुळे कारेकर यांची तत्काळ बदली  करावी. अशी तक्रार मागणी  शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीनुसार संबंधित तक्रारीची गंभीर दखल घेवून श्री कारेकर यांची सखोल चौकशी करून त्यांचा शिस्तभंग विषय कारवाईचा प्रस्ताव शासनास सादरकरण्याचे निर्देश दिले आहे. शिरसाट यांच्या तक्रारीनुसार कारेकर यांनी शिक्षक समायोजन, बदली मान्यता,अनुकंपा मान्यता व इतर अनेक प्रशासकीय बाबी दफ्तर दिरंगाई करून भ्रष्टाचार करण्यासाठी पुणे जिल्हातील शाळा,व शिक्षकांना वेठीस धरून भ्रष्टाचार केला.
डिसेंबर २५ मध्ये राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार यांनी शिक्षण आयुक्तांकडे कारेकर यांच्या कामकाजाबाबतीत गंभीर तक्रार
केली असून अंदाजे २५० पेक्षा अधिक अनियमितता केला आहे. यासाठी कारेकर यांनी लाखो रुपये स्वीकारल्याचा आरोप वाडेट्टीवार यांनी  निवेदनाद्वारे आरोप करून निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र दिले होते. तक्रारीत्यानुसार कारेकर यांच्या अनियमित कामकाजाची चौकशी शिक्षण उप संचालक डॉ सुचिता पाटेकर या करीत आहे.
 शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांची प्रशासकिय कार्यपद्धती ही भ्रष्ट व मुजोर वृत्तीची आहे . केवळ स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी त्यानी अनेक अनुकंपा तत्वावरील विधवा महिलांचे तसेच पात्र उमेदवारांचे प्रस्ताव वर्षानुवर्षी प्रलंबित ठेवले आहेत . अनेक अनियमित प्रकरण भ्रष्टाचार करून केलेली आहे .विशेष म्हणजे हे अधिकारी जनतेला उपलब्ध न होता म्हणजेच स्वतःच्या कार्यालयात न बसता एखाद्या शाळेत बसून प्रशासकीय कारभार चालवतात.त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांच्या तक्रारी बदलीची मागणी शिक्षक सेनेमार्फत केलेली आहे .
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00