Home पिंपरी चिंचवड फॅशन शोमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन 

फॅशन शोमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी 
पिंपरी चिंचवड शहरातील फॅशन दुनियेला ग्लॅमर आणि शैलीची नवी झळाळी देणारा ‘रनवे हाइस्ट सीझन-२’ या भव्य सोहळ्यात मॉडेल्स, मुले व महिलांनी विविध प्रकारचे वस्त्र परिधान करून एक भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणले.
प्रख्यात नृत्य दिगदर्शक पूजा सिंह यांच्या संकल्पनेतून आणि दिवा पेजंट्सच्या सहकार्याने हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने शहरातील फॅशनप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला इस्कॉन प्रणित हरेकृष्ण या भक्तीगीताने राधा कृष्णाची वेशभूषा करून पोशाख सादर केले.यातून पौराणिक अध्यात्मिक संस्कृतीचे दर्शन घडवले.दुसऱ्या फेरीत ३ ते १५ या वयोगटातील लहान मुलांनी रन वाल्क करून टाळ्यांची दाद दिली.यावेळी लहान मुलांना पालकांनी साथ संगत केली.शिवाय पुरुष- महिला जोडीने रन वाल्क केले.
यावेळी देशभरातील ५० हून अधिक मॉडेल्सनी आकर्षक पदभ्रमण सादर करत आपल्या अदाकारीने रसिकांवर मोहिनी घातली. कार्यक्रमात विविध नामांकित वेशभूषाकार आणि वस्त्रसंग्रहांनी विशेष दाद मिळवली. डोर – ड्रेस ऑन रेंट, बीइंग डिझायनर सिमी, पोश, पुष्पांचल, रॉयल टास्टा तसेच प्रियांका दुबे यांच्या आकर्षक आणि आधुनिक वस्त्रसंग्रहाने उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यात अनुपमा सिंह, रिधमा काकाणी, लता पांडे, निशा यादव, नीलू मेहता, रेखा पलाडी, आरती बोरोले, मेहर इक्बाल आणि अभिज्ञा खोब्रागडे,बाल कलाकार सिद्धी मोहोळकर, श्रीशा दासगुडे यांच्या  मोहक सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभूती पांडे यांनी केले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00