Home पिंपरी चिंचवड मोशी मध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

मोशी मध्ये इंधन दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
केंद्र सरकारने मागील अकरा दिवसात चार वेळा पेट्रोल डिझेल च्या किमतीमध्ये दरवाढ केली. यामुळे औद्योगिक नगरीतील कष्टकरी जनतेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना “महागाई मॅन मोदी” असे संबोधून टीका केली आहे, ती रास्त असल्याची भावना मोशी येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यास आलेल्या नागरिकांमध्ये असल्याचे दिसून आले. सोमवारी, मोशी येथे भोसरी – मोशी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नागरिकांना मेलडी चॉकलेट देऊन त्यांच्या इंधन दरवाढी विरोधात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात फलक हातात धरून घोषणा देण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव चौधरी, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव व प्रभारी सत्यजीत बिरादार यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे समन्वयक मयुर रोकडे व स्वप्नील रोकडे यांनी आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ॲड. उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष वहाब शेख, स्वप्नील रोकडे, मिनल रोकडे, साजिद खान, हिरा जाधव, हरीश डोळस, सुनील कांबळे, रुपेश जाधव, श्रीपाद लोंढे, इरफान खान आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या नागरिकांना मेलडी चॉकलेट देऊन इंधन दरवाढ बाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आणि इंधन दरवाढी व विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. अच्छे दिन चे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकार बद्दल प्रचंड निराशा पदरी पडल्याचे एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00