पिंपरी
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती द्यावी. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व नियोजनासंदर्भातील सर्व कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा आणि नागरिकांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारे शहरीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रवाशाभिमुख करण्याच्या दृष्टीने एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै २०२६ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अति पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅ
या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्
प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्
या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक
सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवें
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एचसी
पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्या
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिं
