Home पिंपरी चिंचवड पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेबाबत आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक-  खा. श्रीरंग बारणे 

पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेबाबत आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक-  खा. श्रीरंग बारणे 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी 
मावळातील पवना धरण परिसरातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राबाबतच्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत आंदोलनात सहभागी शेतकरी आणि प्रशासनाबरोबर सोमवारी समन्वय बैठक झाली. या बैठकीत आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. प्रशासनाने संपूर्णा मागण्या समजावून घेऊन त्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली.
जलवाहिनी प्रकल्प बाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री  बाळा भेगडे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पाठबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे,  मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आणि आंदोलक, धरणग्रस्त सर्व शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील माहिती दिली.   शेतकऱ्यांच्या मागण्यावर याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
पवना धरणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यामोबदल्यापोटीच्या जमिनीचे वाटप करावे. मावळसाठी किती पाणी आरक्षित ठेवले जाणार आहे, याचा खुलासा करावा. पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मावळ तालुक्यातील गावांना शुद्ध पाणी द्यावे. आंदोलनात जखमी झालेल्यांना महापालिकेत नोकरी द्यावी. महापालिकेने धरण क्षेत्रातील विकास कामे करावीत. पवनाधरणग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्यांना महापालिकेतील नोकरीसाठी पाच टक्के कोटा आरक्षित ठेवावा.  पवना नदी मृत होणार नाही, पाणीसाठा जिवंत राहील, या पद्धतीने नदी स्वच्छ ठेवावी. परिसरातील गावांना स्वच्छ पाणी मिळावे, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी बैठकीत केल्या. त्यावर जलवाहिनीच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत सुरुवातीलाच माफी मागून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविल्या जातील. जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे.  सर्वांनी सकारात्मकपणे पुढे जावे. त्यात सर्वांचेच हित आहे. प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करेल. प्रश्नांबाबत पूर्ण आश्वासन मिळाल्यानंतरच प्रकल्पाबाबत पुढील कारवाई केली जाईल.पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी म्हणाले, पवना नदीलगतची कामे हाती घेतली आहे. नदीकाठी एसटीपी उभारले जाणार आहेत. त्याची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. पवना बंदिस्त जलवाहिनी योजना अतिशय आवश्यक आहे. नदी पात्रातील पाणी खराब झाले आहे. बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणल्यास शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल.
आंदोलक शेतकऱ्यांची प्रशासनाबरोबर अतिशय सकारात्मत बैठक झाली आहे.  शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडस्या आहेत. त्यापैकी किती मागण्या पूर्ण होतील, याबाबत पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक होणार आहे. शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय न होता ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
श्रीरंग बारणे,
खासदार
मावळ  
गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणासाठी संपादित झालेल्या शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावावेत. धरणग्रस्तांच्या मागण्या समाजावून घेऊन त्या सोडविल्यास आमचा विरोध राहणार नाही. मी पूर्णपणे मावळच्या जनतेबरोबर आहे. 
सुनील शेळके, 
आमदार, 
मावळ
आत्तापर्यंत मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केल्या आहेत. पवना धरण, संरक्षण, रेल्वे, रस्ते, औद्योगिक क्षेत्रासाठी जमिनी संपादित झाल्या आहेत. आम्ही विकासाला प्राधान्य देतो. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचावव्यात. मागण्या निकाली निघत असतील, तर सर्व सहमतीने निर्णय घेण्याचा विचार केला जाईल. 
बाळा भेगडे,
माजी आमदार
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00