Home पिंपरी चिंचवड शिवप्रेमी साहित्यिक संभाजी बारणे यांची मसापच्या सल्लागार पदी निवड 

शिवप्रेमी साहित्यिक संभाजी बारणे यांची मसापच्या सल्लागार पदी निवड 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ साहित्यिक व शिवप्रेमी संभाजी बारणे यांची महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे.
 मसाप पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी नुकतेच बारणे यांना नियुक्तीपत्र दिले. १९०६ साली न्या. गोविंद रानडे, लोकमान्य टिळक आणि न. ची. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था स्थापन केली. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या विकासासाठी जगभर काम करणारी ही अग्रेसर संस्था आहे. या संस्थेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या सल्लागारपदी पुढील दोन वर्षांसाठी संभाजी बारणे यांची निवड करण्यात आली आहे. बारणे यांनी चित्रपट, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर लिहिलेल्या ५५० पेक्षा जास्त ग्रंथांचे संकलन आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींच्या व्हिसिटिंग कार्डचा मोठा संग्रह आहे. या दोन्हीची दखल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचे महत्व सांगणाऱ्या १०० कवींचा कविता संग्रह देखील प्रकाशित केला आहे. संभाजी बारणे यांच्या निवडीचे उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, कार्यवाह संजय जगताप आणि शहरातील साहित्य प्रेमी नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00