पिंपरी 
 कलेक्टिव्ह गुड फौंडेशन व मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प एज्युकेशन सोसायटी (निगडी) येथे मोफत अँडव्हान्स इलेक्ट्रिक व्हेइकल सर्विस टेक्निशियन कोर्स सुरू होत आहे.
पेट्रोल व डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून भविष्यात इलेक्ट्रिक वाहन उद्योगामध्ये कुशल तंत्रज्ञांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राधिकरण निगडी, पुणे येथे “अँडव्हान्स इलेक्ट्रिक व्हेइकल सर्विस टेक्निशियन” हा अल्पकालीन कौशल्य विकास कोर्स सुरू करण्यात आला आहे.
या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची रचना, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली (BMS), मोटर कंट्रोलर, चार्जिंग सिस्टम, फॉल्ट डायग्नोसिस, मेंटेनन्स, सेफ्टी प्रॅक्टिसेस, वायरिंग, टेस्टिंग व रिपेअरिंग यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम CSR च्या अंतर्गत राबवला जाणार असून इच्छुक लाभार्थींना प्रशिक्षण पूर्ण करण्याकरिता आर्थिक सहायता दिली जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी पात्रता किमान आय टी आय/डिप्लोमा उत्तीर्ण, वय १८ ते ३० वर्षे अशी आहे. मुले व मुली दोघांनाही प्रवेश उपलब्ध आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच ई-व्हेइकल सर्विस सेंटर सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
आजच्या काळात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. शासनाच्या हरित ऊर्जा व प्रदूषणमुक्त वाहतूक धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आधुनिक कौशल्याधारित कोर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष  वालचंद संचेती यांनी केले आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राधिकरण निगडी, पुणे ९९६०२८५८८३/ ७३८५४८७७२७ या क्रमांकावर संपर्क साधन्याचे आवाहन केले आहे
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00