58
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाच्या अनुषंगाने आढावा बैठक माझ्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी महापालिका अधिकारी, प्रकल्पाचे डिझायनर मे एच.सी.पी , सल्लागार मे.डी.आर.ए तसेच ठेकेदार मे. बी. जी. शिर्के उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये नदी सुधार प्रकल्पाला गती देऊन नदीकाठ सुशोभीकरणाबरोबरच नदी प्रदूषण रोखणे, नदीकाठची जैवविविधता जतन करणे, पूर परिस्थितीमध्ये देखील नदीकाठच्या परिसरामध्ये कुठलीही हानी पोहोचू नये तसेच कमीत कमी वृक्षतोड करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे याबाबत नियोजनबद्ध चर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर भविष्यात मुळा व पवना नदीमध्ये जलवाहतूक सुरू करण्याचा माझा मानस आहे. त्या अनुषंगाने ठिकठिकाणी जेट्टी बांधण्याच्या दृष्टिकोनातून नदीवरील घाट डिझाईन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून जर नदीमध्ये काही अडथळे येत असतील जसे की बंधारे, छोटे पूल इ. तर त्याचे देखील नियोजन आत्ताच करावे, तसेच भविष्यात नदीच्या कडेने 30 मीटर रुंद रिंग रस्ता करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या बाबीचा देखील नदी सुधार प्रकल्पामध्ये विचार करण्यात यावा. कामाच्या गुणवत्तेमध्ये कुठलीही हलगर्जीपणा होता कामा नये अशा स्पष्ट सूचना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तसेच ठेकेदार यांना देण्यात आल्या.
Please follow and like us:
