50
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्टस सेंटर, थेरगाव तर्फे ड्रॅगन बोट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.तसेच या समारंभादरम्यान ड्रॅगन बोट चालविण्याचा आनंद घेतला. पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्टस सेंटर तर्फे खेळाडूंच्या प्रगतीसाठी व खेळा डू घडवण्यासाठी सतत उपक्रम सुरू असतात. या वर्षी देखील हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत खेळाडूंच्या कला कौशल्याला चालना देण्याचे कार्य सुरु आहे.
प्रगतशील आणि विकसित शहराकडे वाटचाल करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले शहर अग्रेसर राहावे याच विचारातून विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक प्रकारात आपल्या शहरातील खेळाडूंचा सहभाग असावा, तसेच जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत याच महत्व कांक्षेने आम्ही सर्वजन कार्यरत असतो शहरामध्ये नदी सुधार प्रकल्प राबवीत असताना प्रकल्पांतर्गत खेळाडूंना वाटर स्पोर्टचे चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आणि उपाययोजना करण्याचा विश्वास या उद्घाटनाप्रसंगी दिला.
याप्रसंगी अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर वॉटर स्पोर्ट सेंटर/अध्यक्ष ड्रॅगन बोट असोसिएशन महाराष्ट्र राज्य श्री.सिद्धेश्वर बारणे , रिअर एडमिरल मा.रवींद्रजी नाडकर्णी, मा.पी. के. मल्होत्रा, सेक्रेटरी श्री. दत्तात्रय बारणे, सेक्रेटरी श्री. डॉ. गोपी शेट्टी, इतर सर्व मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते
Please follow and like us:
