72
पिंपरी चिंचवड
मा.नगरसेविका सौ.जयश्रीताई गावडे यांच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा “होम मिनिस्टर” या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. महिला भगिनींच्या सामर्थ्याचा आणि संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानले.
आपला भारत देश आपले राज्य आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना आपली परंपरा जोपासणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या खेळांच्या माध्यमातून ती संस्कृती आज ही टिकून आहे याचा मला आनंद आहे. जेव्हा महिलांना समान संधी दिल्या जातात, तेव्हा त्या कुटुंब, समाज आणि देशाच्या विकासासाठी एक मोठा हातभार लावतात. आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता साधत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाला नव्या उंचीवर घेऊन जात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय जगासमोर मांडला असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.
तसेच आपली परंपरा आणि संस्कृती जोपासत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे अशी इच्छा यावेळी व्यक्त केली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या भावी आयुष्यासाठी सुख, समृद्धीची आणि भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.अनुप मोरे, जिल्हा सरचिटणीस श्री.नामदेव ढाके, श्री.वसंत गावडे, श्री.उमेश गावडे, श्री.रोहित गावडे, श्री.करण गावडे, श्री.आनंद गायकवाड, श्री.अजिंक्य जाधव आदी उपस्थित होते.
Please follow and like us:
