17
पिंपरी
बीड व सोलापूर जिल्ह्यांत अलीकडील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. गावाच्या चारही बाजूला पाणी आल्याने शेकडो कुटुंबे विस्थापित झाली असून, अनेक ठिकाणी अन्न, पाणी व निवाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला धावत जात भाजप नगरसेवक संदीप वाघेरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने नागरिकांना सुमारे ५०० जीवनावश्यक किटचे वाटप करीत दिलासा दिला.
संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील आहेर चिंचोली, शेळके वस्ती, देवडे वस्ती, खामगाव, भावले वस्ती, दिंडे वस्ती, हिरापूर या पूरग्रस्त गावांमध्ये २५० किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच सोलापूर जिल्यातील माढा तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाच्या सहकार्यातून २५० किटचे आज वाटप करण्यात आले. या किटमध्ये गव्हाचे पीठ,तांदूळ,तुरडाळ,तेल,मसाले, साखर,लहान मुलांसाठी बिस्किटे तसेच खाऊचे पदार्थ व इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता, ज्यामुळे या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.याचबरोबर, रामनगर येथील ‘स्नेह सावली’ अनाथ आश्रमातील 20 विद्यार्थी आणि 15 वृद्ध नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह रोख स्वरूपात मदत करण्यात आली. 

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, बीड व सोलापूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांच्या रोजच्या जीवनात मोठा अडथळा निर्माण झाला. बीड जिल्यातील माझे सहकारी राहुल इन्कर,अजय कारंडे,गणेश बाहीर,विकास रकटे,बाळू रकटे तसेच सोलापूर जिल्यातील यशवंत भोसले साहेब यांनी माझ्याशी संपर्क साधत जिल्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची माहिती दिली होती. या आपत्तीमुळे निर्माण झालेल्या वेदना आणि अडचणी मला अंतःकरणापासून जाणवल्या.समाजाचे आपण काही देणे लागतो, या जाणिवेतून प्रेरित होऊन मी स्वखर्चातून सुमारे ५०० अन्न व जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचवले. हे काम करत असताना अनेकांचे अश्रूंनी भरलेले डोळे, त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव पाहताना एक वेगळाच आनंद व समाधान लाभले.माझा उद्देश फक्त मदत करणे नाही, तर समाजात ही भावना पेरणे आहे की प्रत्येकाने शक्य तितक्या प्रमाणात एकमेकांच्या मदतीला धावून जायला हवे. आपत्तीच्या काळात एकमेकांचा आधार होणं हीच खरी माणुसकी आहे.मी माझा मित्र परिवार तसेच प्रशासनाचे, स्थानिक कार्यकर्त्यांचे व स्वयंसेवी संस्थांचे आभार मानतो, ज्यांनी ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात सहकार्य केले. पुढील काळात देखील गरजूंना मदतीचा हात देण्याचा माझा संकल्प आहे.
या व्यापक मदत उपक्रमामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यात सुरेश निकाळजे (माजी अध्यक्ष, रि.पा. इं.), संदीप कापसे, शेखर अहिरराव, अतुल वाणी, किशोर येळवडे, शांताराम वाघेरे, वीरेंद्र यादव, अनिस अन्सारी, शहाजीत अत्तार, राजेंद्र वाघेरे, कुणाल सातव, कुणाल साठे, अक्षय नाणेकर, निखिल जुनागरे, राहुल गवळी, राकेश मोरे, हनुमंत वाघेरे, सतीश भवाळ, अमित कुदळे, गणेश मंजाळ, हेमंत कांबळे, शुभम मिटकरी, रवी ससाने, प्रवीण तडसरे, महेश वडमारे, अभिजित वाघेरे, बाळू आंबूसकर, आयेश अत्तार, गौरव पाटील, गौरव कुदळे, निखील पवार, राजू मोरे,राजू गुंडीले, व इतर सहकारी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला
Please follow and like us:
