Home पिंपरी चिंचवड चिंचवडच्या जनतेचे माझ्यावर ऋण; तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”

चिंचवडच्या जनतेचे माझ्यावर ऋण; तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”

आमदार शंकर जगताप यांनी चिंचवडच्या जनतेसह महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मानले आभार

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

आमदार शंकर जगताप यांच्या ‘विजयी आभार मेळाव्या’ला रहाटणी-काळेवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिंचवड

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चिंचवडच्या जनतेने प्रचंड आशीर्वाद देत मला भरघोस बहुमताने विजयी केले. तुम्ही माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास व्यक्त केला त्या ऋणातून मी कधी मुक्त होऊ इच्छित नाही. कारण तुमचे हे ऋणच मला पुढील काळात तुमची सेवा करण्यासाठी व आपल्या चिंचवडचा विकास करण्यासाठी नेहमी प्रेरित करीत राहील. तुम्ही माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी यावेळी दिला.

चिंचवड विधानसभा निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांनी विक्रमी लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयानंतर रहाटणी – काळेवाडी परिसरातील मतदारांचे आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी रहाटणी येथील थोपटे लॉन्स याठिकाणी आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार जगताप म्हणाले की, चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी, तसेच आपल्या विधानसभेला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आगामी काळात शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, अध्यात्म, क्रीडा तसेच मुलभूत सुखसुविधांसह, माझ्या लाडक्या बहिणी, तरुण, ज्येष्ठ नागरिक, माय-माऊली यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

निवडणूक काळात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील  भारतीय जनता पक्षासह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं (आठवले) मित्रपक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अगदी खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस एक करत प्रचारासाठी अपार मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीचे फळ म्हणूनच आपण हा विक्रमी महाविजय साकार करू शकलो, त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्याचबरोबर अत्यंत प्रामाणिकपणे नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज, सजग रहो मंच, बजरंग दल या सर्व मातृसंघटनांचे, तसेच निवडणूक काळात जाहीर पाठींबा दिलेल्या सर्व सामाजिक संघटना व समाज बांधवांचे आमदार जगताप यांनी  विशेष आभार मानले.

यावेळी भाजपा प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, मा.नगरसेवक कैलास थोपटे, चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभुवन, विनोद नढे, प्रमोद ताम्हणकर, नगरसेविका सुनीता तापकीर, सविता खुळे, नीता पाडाळे, ज्योती भारती, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, मंडल अध्यक्ष संदीप नखाते, युवा मोर्चा शहराध्यक्ष राज तापकीर, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, विनोद तापकीर, संदीप गाडे, देवीदास तांबे, बाबासाहेब जगताप, देविदास पाटील, नवनाथ नढे, सागर कोकणे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, जयनाथ काटे, रमेश काळे, गणेश नखाते, सोमनाथ तापकीर, नरेश खुळे, विलास पाडाळे, नेताजी नखाते, भाऊसाहेब आडूळकर, चंद्रकांत तापकीर, प्रकाश ताम्हणकर, दत्ता कदम, विजय सुतार, सुनील पालकर, सखाराम नखाते, शारदा मुंडे, दिलीप काळे, गोरक्षनाथ झोळ, मंगेश नढे, दीपक जाधव, संतोष जगताप, नरेंद्र माने, कैलास सानप, माधव मनोरे, संतोष जगताप, संजय भोसले, विशाल माळी, नामदेव शिंत्रे, कानिफनाथ तोडकर, श्याम गोडांबे, आदेश राजवाडे, शिवसेना नेते अंकुश कोळेकर, शुभम नखाते यांच्यासह सर्व महायुती पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते.

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00