Home पिंपरी चिंचवड तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विलास भेगडे, सचिवपदी डॉ. संदीप गाडेकर यांची सर्वानुमते निवड

तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विलास भेगडे, सचिवपदी डॉ. संदीप गाडेकर यांची सर्वानुमते निवड

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनची सर्वसाधारण सभा रविवारी (दि.२१) येथे  उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सभेचे पिठासन अध्यक्ष म्हणून  ज्येष्ठ पत्रकार योगेश्वर माडगूळकर होते.
यावेळी तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी दै. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार विलास भेगडे व सचिवपदी महाऑनलाईन न्यूजचे संपादक डॉ. संदीप गाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रेस फाउंडेशनचे सल्लागार विवेक इनामदार,  मंगेश फल्ले, संस्थापक अध्यक्ष
अमिन खान, कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे, उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी, खजिनदार अंकुश दाभाडे, पत्रकार परिषद प्रमुख रेखा भेगडे, ज्येष्ठ सदस्य राधाकृष्ण येणारे, संतोष थिटे, सुरेश शिंदे, चित्रसेन जाधव, अमित भागीवंत, मयूर सातपुते, सृजल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना विवेक इनामदार म्हणाले, पत्रकारितेमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. AI तंत्रज्ञान आल्यामुळे डिजिटल पत्रिकारितेमधील आव्हाने वाढली आहेत. राज्य पत्रकार संघाच्या पत्रकारांसाठी असलेल्या प्रकल्प उपक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकार यांनी देखील खंबीर साथ देण्याचा शब्द दिला आहे. संवादातून पत्रकारांनी जागल्याची भूमिका निभवावी.
 योगेश्वर माडगूळकर म्हणाले, पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्राधान्य क्रमाने करावे. सर्वसामान्य नागरिक व प्रशासन यांना जोडणारा पत्रकार हा दुवा आहे. पत्रकारांनी  निर्भीडपणे काम करावे.
अमीन खान म्हणाले, पत्रकारिता हा आपला धर्म असून तळागाळातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम प्राधान्याने करावे. निर्भीडपणे काम करतानाकोणाच्याही दबावाला बळी पडू नये.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विलास भेगडे व सचिव डॉ.संदीप गाडेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
स्वागत व सूत्रसंचालन जगन्नाथ  काळे यांनी केले. रेखा भेगडे यांनी आभार मानले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00