Home पिंपरी चिंचवड पीसीएमसी रनथॉन ऑफ होप २०२५चे आयोजन

पीसीएमसी रनथॉन ऑफ होप २०२५चे आयोजन

रोटरी क्लब निगडीचा आयोजनासाठी पुढाकार 

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
रोटरी क्लब ऑफ निगडी–पुणे च्या वतीने पीसीएमसीच्या सहकार्याने “पीसीएमसी रोटरी मिराए अ‍ॅसेट म्युच्युअल फंड “रनाथॉन ऑफ होप”चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी महापौर बंगला ग्राउंड, प्राधिकरण, निगडी येथे होणार आहे.
ही स्पर्धा सकाळी ५:३० वाजता सुरू होईल, आणि यात पुरुष व महिला दोन्ही गटांसाठी हाफ मॅरेथॉन (२१ कि.मी.), १० कि.मी. आणि ५ कि.मी. अशा तीन शर्यतींचा समावेश आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच इतर शहरांतील नागरिक, कॉर्पोरेट कर्मचारी आणि फिटनेसप्रेमी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती  रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष केशव मानगे, रनाथॉन संचालक शशांक फडके यांनी दिली.
क्लबचे अध्यक्ष केशव मानगे म्हणाले, रनाथॉनचे वार्षिक उपक्रमाचे १४ वे वर्ष आहे.
“रनथॉन ऑफ होप ही फक्त एक मॅरेथॉन नाही, तर एक चळवळ आहे. वर्षानुवर्षे या उपक्रमाने हजारो लोकांना एका समान ध्येयासाठी — समाजसेवा आणि आशा निर्माण करण्यासाठी — एकत्र आणले आहे.”
 रनथॉन संचालक श्री शशांक फडके म्हणाले कि,
“यावर्षी आम्हाला मिराए अ‍ॅसेट म्युच्युअल फंड हे टायटल प्रयोजक म्हणून लाभले आहेत. यांच्या सहकार्यामुळे रोटरी आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र येऊन समाजात कायमस्वरूपी बदल घडवू शकतील.” तसेच इतर सर्व आम्हांला लाभलेले प्रयोजकांचे देखील आभार म्हणतोय.
२०१० साली सुरू झालेला रनथॉन ऑफ होप हा पीसीएमसी परिसरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतीक्षित वार्षिक उपक्रमांपैकी एक बनला आहे.
आतापर्यंतच्या १३ आवृत्त्यांमध्ये १,००,००० पेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला असून त्यांनी एकूण ५७,०००+ किलोमीटर अंतर धावले आहे.
या उपक्रमातून मिळालेल्या निधीद्वारे रोटरी क्लब ऑफ निगडीने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या सामाजिक प्रकल्पांवर खर्च केला जातो.
हा कार्यक्रम सर्व वयोगटांसाठी खुला आहे — धावपटू, चालणारे आणि कुटुंबासह सहभागी होणारे सर्वजण एकत्र येऊन आशा, उत्कटता आणि सेवाभावाचा उत्सव साजरा करू शकतात.
रनथॉनपूर्वी दोन आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर शुक्रवार रोजी सायं. ७:३० वाजता एक सुंदर संगीतमय कार्यक्रम — “एव्हरग्रीन सॉंग्स नाईट ” आणि
 १० व ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान रनथॉन एक्स्पो आणि शॉपिंग फेस्टिव्हल.
हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे .
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00