Home पिंपरी चिंचवड पावसामुळे पडलेली १० झाडे अग्निशमन विभागाने तात्काळ हटवली

पावसामुळे पडलेली १० झाडे अग्निशमन विभागाने तात्काळ हटवली

by Pawanasamachar@gmail.com
0 comments

पिंपरी

 पिंपरी चिंचवड शहरात १४ व १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या पावसामुळे १० ठिकाणी पडलेली झाडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी हटवली. झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत ती हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.  यातील काही झाडे घरांवर/भिंतीवर पडून टेकली होती. ती झाडे जमिनीवर पूर्णपणे पडण्याच्या धोका संभवत असल्याने व त्यामुळे परिसरातून प्रवास करणाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदरील अर्धवट पडलेल्या झाडास पूर्णपणे बाजूला करण्यात आले.

 शहरामध्ये १४ व १५ सप्टेंबर असे सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडेफांद्या पडल्या. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तातडीने झाडेफांद्या हटविण्याचे काम सुरू केले. १४ व १५ सप्टेंबर (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या दोन दिवसांमध्ये अग्निशमन विभागाच्या वतीने १० ठिकाणांतील झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली आहेअशी माहिती अग्निशमन विभागातून देण्यात आली. तसेच अर्धवट पडलेल्या झाडापासून नागरिकांनी दूर म्हणजेच सुरक्षित अंतर बाळगावेआपत्कालीन परिस्थितीत तातडीने अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

अग्निशमन विभागाचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक:

पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७५

भोसरी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७६

प्राधिकरण अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७७

चिखली अग्निशमन केंद्र – ८६६९६९४१०१

थेरगाव अग्निशमन केंद्र – ७०३०९०७९९९

रहाटणी अग्निशमन केंद्र – ९९२२५०१४७८

मोशी अग्निशमन केंद्र – ७२६४९४३३३३

तळवडे अग्निशमन केंद्र – ९५५२५२३१०१

चोविसावाडी अग्निशमन केंद्र – ८४८४८०३१०१

नेहरूनगर अग्निशमन केंद्र – ८४८४०५११०१

Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00