चिंचवडः–
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि माझे आदरणीय मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील यांनी शंकर जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
माझ्या विजयाबद्दल त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोथरूड मतदारसंघात आमदारपदी प्रचंड बहुमताने झालेल्या त्यांच्या विजयानिमित्त आणि महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल, शहर भाजपच्या सर्व पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करताना चंद्रकांतदादांचे मार्गदर्शन आणि त्यांचे अनुभवसंपन्न विचार नक्कीच दिशादर्शक ठरतील. दादांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते पक्षाच्या ध्येयधोरणांचे पालन करीत काम करत राहू आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्नशील राहू, असा दृढ निश्चय यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचे शंकरभाऊ जगताप यांची चिंचवडच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान स्वर्गीय लक्ष्मणभाऊंच्या स्मृतींना अभिवादनही केले. या वेळी भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
