Home पिंपरी चिंचवड ग्रामीण- शहरी यांच्यातील दरी कमी करण्याची इंजिनियरवर जबाबदारी – घोडे

ग्रामीण- शहरी यांच्यातील दरी कमी करण्याची इंजिनियरवर जबाबदारी – घोडे

डी. वाय. पाटील टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये आयईटीई व टेसा क्लबची स्थापना

by Pawanasamachar@gmail.com
0 comments
पिंपरी
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात दि इन्स्टिटयूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स (आयईटीई) आणि  टेलिकॉम इंजिनियरिंग स्टुडन्ट असोसिएशन (टेसा) क्लब स्थापनेचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ डी जी भालके, डॉ. गायत्री लोंढे,डॉ. प्रमोदकुमार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
 प्रमुख पाहुणे शिवाजी घोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषाणात ज्येष्ठ संशोधक थॉमस एडिसन व अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या जीवनचरित्राच्या कथा सांगून उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच शहरी भारत आणि ग्रामीण भारत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आपण अभियंता म्हणून विशेष संशोधन करण्याची आवश्यकता आहे. केवळ उत्तम पॅकेज किंवा पदवी प्राप्तीसाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेवू नका तर वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या समस्या कशा सोडवता येईल यासाठी भविष्यात संशोधक म्हणून तुम्हाला भूमिका पार पाडावी लागणार आहे. असे मत श्री शिवाजी घोडे यांनी व्यक्त केले.
यावेळी विभागप्रमुख डॉ. डी. जी. भालके यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, कार्यक्रम व्यवस्थापन व तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी या क्लब्सचा कसा उपयोग होईल हे सांगून पुढे म्हणाले कि, दि इन्स्टिटयूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स (आयईटीई) ही भारतातील आघाडीची व्यावसायिक संस्था असून इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रगती घडवून आणते. आयईटीई स्टुडन्ट फोरम (ISF) हे विद्यार्थ्यांना कार्यशाळा, सेमिनार्स, व उद्योगतज्ज्ञांच्या तांत्रिक व्याख्यानांद्वारे तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तसेच नाविन्य, संशोधन, प्रकल्पकार्य, करिअर मार्गदर्शन, उद्योगभेटी आणि शैक्षणिक व औद्योगिक नेटवर्किंगची संधी देखील उपलब्ध करतो.
यावेळी डॉ गायत्री लोंढे म्हणाल्या कि,टेलिकॉम इंजिनियरिंग स्टुडन्ट असोसिएशन (टेसा) हा विद्यार्थ्यांचा, विद्यार्थ्यांनी चालवलेला आणि विद्यार्थ्यांसाठी असलेला मंच आहे. टेसाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धी व व्यक्तिमत्व विकास साधताना सहकार, नेतृत्वगुण व टीम स्पिरिट वाढविणे. हा मंच उद्याचे सक्षम नेते व कुशल व्यावसायिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देतो.
डॉ कुलकर्णी यांनी आयईटीई फोरमच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी क्लबमधील विविध पदांवर विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, क्रिएटिव्ह प्रमुख, खजिनदार, इव्हेंट मॅनेजमेंट हेड व टेक्निकल हेड अशा पदांवर  विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पदाचे नियुक्तीपत्र व  बॅजेस पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डॉ डी वाय
पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचे प्र कुलपती डॉ. सोमनाथ पाटील, उपकुलगुरु डॉ. धीरज अग्रवाल, आणि प्राचार्य डॉ. नितीन शेरजे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Please follow and like us:

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
Wordpress Social Share Plugin powered by Ultimatelysocial
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00