47
पिंपरी
पुस्तकाने मानवी जीवन बदलते. ज्ञान हे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचे दिशादर्शक आहे.ज्ञान देवत्व प्राप्तीचे साधन आहे. मात्र आपल्या घासातील घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती जेव्हा येईल तेव्हा आपला समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाला, असे म्हणता येईल.असे प्रतिपादन स्नेहवनचे अध्यक्ष अशोक देशमाने यांनी व्यक्त केले.
निगडी येथील डॉ अरविंद ब. तेलंग कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने डॉ अरविंद तेलंग स्मृती करंडक आंतर महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले होते.या स्पर्धेच्या उदघाटन प्रसगी ते बोलत होते.
यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, संचालक डॉ मिलिंद तेलंग, डॉ प्रवदा तेलंग, परीक्षक प्रा.प्रदीप कदम, शांताराम वाघ, प्राचार्य प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ तेलंग म्हणाले कि,समाजासाठी काहीतरी करता यावे ही भावनेने स्व तेलंग हे सतत सक्रिय असायचे . समाजाचा उत्कर्ष शिक्षणातूनच होईल.
आयुष्यात मोठे होण्यासाठी शिक्षक आणि साथसंगत उत्तम असेल तर आपला विकास होतो. उत्तम संगत आयुष्यात गरजेचे आहे. भारत देशाला मोठे करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षकांना आयडॉल माना. ते तुम्हांला आत्मविश्वासातून उत्कर्षापर्यंत नेतील .असे सांगून त्यांनी स्व. तेलंग यांच्या जुन्या आठवणी जागवल्या.
यावेळी वालचंद संचेती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. विद्याथ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी महाविद्यालयाचा आढावा घेतला.
या स्पर्धेत प्रथम कमांक कु. अगवणे सुग्रीव बालाजी आणि कु. खडके साक्षी सुरेश (कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, वाकड) यांनी प्रथम कमांक मिळविला. व्दितीय क्रमांक विभागून देण्यात आला. कु तनिष्का घोवळे व कु. अरणे रोहिणी पोपट आणि अरणे ऋतूजा पोपट व पिंपळे वैष्णवी (डॉ. अरविंद व तेलंग वरिष्ठ महाविद्यालय, निगडी) यांनी व्दितीय कमांक मिळविला,तर तृतीय कमांक कु. दातखिळे शुभम व कु. मोरे रामेश्वर, (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थ बक्षीस कु. हत्तीकर स्नेहल व कु. पवार अंजली (एटीएस एस महाविद्यालय) यांना देण्यात आले.
पारितोषिक वितरण पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त मा. पंकज पाटील, प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी लायन्स क्लब गॅलक्सीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. याची जबाबदारी डॉ. विक्रम शेवाळे यांनी पार पाडली. प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी केले पाहुण्यांची ओळख पा. तुषार भोसले व प्रा. भाग्यश्री मोरे यांनी करून दिली.
तर आभार प्रदर्शन प्रा .डॉ दत्तात्रय खुणे यांनी केले. या कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा ज्योती वाणी यांनी केले.
Please follow and like us:
